ETV Bharat / sports

IPL 2022 RR vs GT : नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सचा गोलंदाजीचा निर्णय; दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल जाणून घ्या - यश दयाल पदार्पण

आयपीएल 2022 ( IPL 2022 ) मधील 24 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स ( Rajasthan Royals vs Gujarat Titans ) संघात होणार आहे. हा सामना मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर संध्याकाळी साडेसातवाजता सुरु होणार आहे. राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

RR vs GT
RR vs GT
author img

By

Published : Apr 14, 2022, 7:22 PM IST

मुंबई: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 24 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स ( Rajasthan Royals vs Gujarat Titans ) संघात होणार आहे. हा सामना मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर संध्याकाळी साडेसातवाजता सुरु होणार आहे. या सामन्याची नाणेफेक पार पाडली आहे. राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय ( Rajasthan Royals opt to bowl ) घेतला आहे. त्याचबरोबर प्रथम फलंदाजी करण्यासाठी गुजरात टायटन्स संघाला आमंत्रित केले आहे.

आयपीएलच्या इतिहासात हे दोन संघ प्रथमच आमने सामने येत आहे. कारण गुजरात टायटन्स संघ यंदा प्रथमच आयपीएलच्या स्पर्धेत सहभागी झाला आहे. राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आपला चौथा विजय नोंदवण्यासाठी, कर्णधार संजू सॅमसन ( Sanju Samson ) आणि हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya ) नेतृत्वाखाली उतरतील.

आज राजस्थान रॉयल्स संघात जिमी निशम पदार्पण करत आहे. त्याचबरोबर गुजरात टायटन्स संघाकडून यश दयाल पदार्पण करत ( Yash Dayal debuts ) आहे. अशा प्रकारे दोन्ही संघात एक-एक खेळाडू पदार्पण करत आहे. यश दयाल हा दर्शन नळकांडेच्या जागी खेळत आहे, त्याचबरोबर विजय शंकर हा सुदर्शनच्या जागाी आज प्लेइंग इलेव्हनमध्ये आहे. तसेच काही कारणास्तव ट्रेंट बोल्ट उपलब्ध नसल्याने त्याच्या जागी जिमी निशमला ( Jimmy Nisham ) राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेवन): जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सैमसन (कर्णधार/यष्टीरक्षक), रस्सी वैन डेर डूसन, शिमरोन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, रियान पराग, जेम्स नीशम, कुलदीप सेन, प्रसिद्ध कृष्णा आणि युजवेंद्र चहल.

गुजरात टाइटंस (प्लेइंग इलेवन): मैथ्यू वेड (यष्टीरक्षक), शुभमन गिल, विजय शंकर, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेविड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान, लॉकी फर्ग्यूसन, मोहम्मद शमी आणि यश दयाल.

हेही वाचा - Captain Rincon Passes Away : कोलंबियाचा माजी फुटबॉल कर्णधार फ्रेडी रिंकनचा कार अपघातात मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.