हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीगच्या ( Indian Premier League ) पंधाराव्या हंगामात आतापर्यंत 50 सामने खेळले गेले आहेत. तसेच या स्पर्धेचे 24 सामने खेळले जाणे बाकी आहेत. गुरुवारी आयपीएलच्या 50 वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ( Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad ) संघात खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 21 धावांनी सनरायझर्स हैदराबादवर विजय नोंदवला, ज्यानंतर दहा संघांच्या गुणतालिकेत बदल पाहायला मिळाले.
-
A look at the Points Table after Match No. 5⃣0⃣ of the #TATAIPL 2022 🔽 #DCvSRH pic.twitter.com/2L2ZeGrg58
— IndianPremierLeague (@IPL) May 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">A look at the Points Table after Match No. 5⃣0⃣ of the #TATAIPL 2022 🔽 #DCvSRH pic.twitter.com/2L2ZeGrg58
— IndianPremierLeague (@IPL) May 5, 2022A look at the Points Table after Match No. 5⃣0⃣ of the #TATAIPL 2022 🔽 #DCvSRH pic.twitter.com/2L2ZeGrg58
— IndianPremierLeague (@IPL) May 5, 2022
गुरुवारी झालेल्या सामन्यानंतर या विजयासह दिल्लीचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहचला आहे. त्याचबरोबर हैदराबाद संघाची सहाव्या स्थानी घसरण ( Hyderabad team Sixth place ) झाली आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या डेव्हिड वॉर्नरने 92 धावांची नाबाद खेळी खेळून आपल्या संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. या मोसमात त्याने चौथ्यांदा 50 चा टप्पा पार केला. तसेच डेव्हिड वॉर्नर आता ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सामील झाला आहे. त्याचवेळी एक विकेट घेणारा कुलदीप यादव पर्पल कॅपच्या शर्यतीत युझवेंद्र चहलच्या जवळ आला आहे.
-
After the Match 5⃣0⃣ of the #TATAIPL 2022, @josbuttler remains at the top of the run-scoring charts & dons the @aramco Orange Cap. 👍 👍
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Meanwhile, @yuzi_chahal continues to be the leading wicket-taker & dons the @aramco Purple Cap. 👏 👏 pic.twitter.com/skJSZn8lKN
">After the Match 5⃣0⃣ of the #TATAIPL 2022, @josbuttler remains at the top of the run-scoring charts & dons the @aramco Orange Cap. 👍 👍
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2022
Meanwhile, @yuzi_chahal continues to be the leading wicket-taker & dons the @aramco Purple Cap. 👏 👏 pic.twitter.com/skJSZn8lKNAfter the Match 5⃣0⃣ of the #TATAIPL 2022, @josbuttler remains at the top of the run-scoring charts & dons the @aramco Orange Cap. 👍 👍
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2022
Meanwhile, @yuzi_chahal continues to be the leading wicket-taker & dons the @aramco Purple Cap. 👏 👏 pic.twitter.com/skJSZn8lKN
गुजरात टायटन्सचा संघ ( Gujarat Titans team ) सध्या गुणतालिकेत 16 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर लखनौ सुपर जायंट्सचे 14 गुण आहेत आणि ते दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच राजस्थान आणि बंगळुरूचे संघ अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. दोघांचे प्रत्येकी 12 गुण आहेत. दिल्लीचा संघ पाचव्या आणि सनरायझर्स हैदराबाद सहाव्या तर पंजाबचा संघ सातव्या स्थानावर आहे. तिन्ही संघांचे 10-10 गुण आहेत. कोलकाता आठ गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. चेन्नई आणि मुंबईचे संघ अजूनही नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर असून दोघांच्याही प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा संपल्या आहेत.
-
Here are the Top Ten Fantasy players at the end of Match 5️⃣0️⃣ of the #TATAIPL 2022. 👏 👏
— IPL Fantasy League (@IPLFantasy) May 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
How many of them did you pick in your Fantasy Team? 🤔 🤔
To make your Fantasy Team, visit 🔽https://t.co/V4VBrgMMMG pic.twitter.com/dVOvGbqkYX
">Here are the Top Ten Fantasy players at the end of Match 5️⃣0️⃣ of the #TATAIPL 2022. 👏 👏
— IPL Fantasy League (@IPLFantasy) May 6, 2022
How many of them did you pick in your Fantasy Team? 🤔 🤔
To make your Fantasy Team, visit 🔽https://t.co/V4VBrgMMMG pic.twitter.com/dVOvGbqkYXHere are the Top Ten Fantasy players at the end of Match 5️⃣0️⃣ of the #TATAIPL 2022. 👏 👏
— IPL Fantasy League (@IPLFantasy) May 6, 2022
How many of them did you pick in your Fantasy Team? 🤔 🤔
To make your Fantasy Team, visit 🔽https://t.co/V4VBrgMMMG pic.twitter.com/dVOvGbqkYX
सर्वाधिक धावा करणारे फलंदाज (ऑरेंज कॅप)
- जोस बटलर- 10 सामने 588 धावा
- लोकेश राहुल- 10 सामने 451 धावा
- शिखर धवन- 10 सामने 369 धावा
- डेव्हिड वॉर्नर- 8 सामने 356 धावा
- अभिषेक शर्मा- 9 सामने 324 धावा
सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज (पर्पल कॅप)
- युझवेंद्र चहल- 10 सामने 19 विकेट्स
- कुलदीप यादव- 10 सामने 18 विकेट्स
- कगिसो रबाडा- 9 सामने 17 विकेट्स
- टी नटराजन- 9 सामने 17 विकेट्स
- वनिंदु हसरंगा- 11 सामने 16 विकेट्स
हेही वाचा - Asian Games Postponed: चीनमध्ये वाढत्या कोविड प्रकरणांमुळे आशियाई क्रीडा स्पर्धा पुढे ढकलली