ETV Bharat / sports

IPL 2022 Updates : दिल्ली विरुद्धच्या सामन्यानंतर धोनीचे मोठे वक्तव्य, म्हणाला 'हा' जगाचा अंत नाही

author img

By

Published : May 9, 2022, 4:55 PM IST

Updated : May 9, 2022, 10:16 PM IST

इंडियन प्रीमियर लीगमध्ये ( IPL 2022 ) रविवारी चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 91 धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयानंतरही संघाचे 11 सामन्यांत केवळ 8 गुण झाले आहेत. तरीही महेंद्रसिंग धोनीचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आशा फार कमी आहे.

Mahendra Singh Dhoni
Mahendra Singh Dhoni

मुंबई: आयपीएलच्या चालू हंगामातील 55 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा 91 धावांनी पराभव ( Chennai Super Kings won by 91 runs )केला. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( Captain Mahendra Singh Dhoni ) म्हणाला की, दिल्ली कॅपिटल्सवर मोठ्या विजयानंतर मला आमच्या संघाच्या प्लेऑफ पात्रतेची काळजी नाही. तो म्हणाला की, भले ही त्या ध्येयात ते अयशस्वी झाले तरी तो 'जगाचा अंत' नाही. त्याला एकावेळी एकाच खेळाचा विचार करायचा आहे असेही तो म्हणाला.

डेव्हॉन कॉनवे (49 चेंडूत 87) आणि मोईन अलीच्या शानदार अर्धशतकाने (3/13) चेन्नई सुपर किंग्जने रविवारी डी. व्हाय पाटील स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सवर IPL 2022 मधील 55 वा सामना 91 धावांनी जिंकला. सीएसकेचा या आयपीएल मोसमातील हा चौथा विजय ( CSK fourth win ) होता. या विजयासह ते केकेआरपेक्षा नेट रन रेटने वर आठव्या स्थानावर पोहोचले. या विजयाने सीएसकेला प्लेऑफच्या शर्यतीत जिवंत ठेवले, जरी त्यांची शक्यता इतर अनेक निकालांवर अवलंबून असली तरी, त्यांनी त्यांचे उर्वरित तीन गेम जिंकले पाहिजे.

धोनी सामन्यानंतर म्हणाला ( Dhoni said after the match ), ''मी गणिताचा फार मोठा चाहता नाही. माझे शाळेतही गणित चांगले नव्हते. नेट रन रेटचा विचार करून उपयोग नाही. तुम्ही फक्त आयपीएल एन्जॉय करा. “जेव्हा इतर दोन संघ खेळत असतात, तेव्हा तुम्ही दडपणाखाली आणि विचारात राहू इच्छित नाही. पुढच्या सामन्यात काय करायचं याचा विचार करायचा आहे. जर आम्ही प्लेऑफमध्ये पोहोचलो तर ते खूप चांगले आहे, परंतु आम्ही जरी नाही केले तरी तो जगाचा अंत होणार नाही.

धोनीने मात्र आपण स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच जिंकत आलो असतो, तर डीसीविरुद्धचा विजय अधिक चांगला ठरला असता असे कबूल केले. हे (विजय) खरोखर मदत करते. यापूर्वीही असे विजय मिळवले असते तर बरे झाले असते. तो एक आदर्श खेळ होता.

हेही वाचा - IPL 2022 Updates : खराब फॉर्मशी झुंज देणार्‍या ऋषभ पंतला शोएब अख्तरने दिला महत्वाचा सल्ला

Last Updated : May 9, 2022, 10:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.