ETV Bharat / sports

MI Vs LSG : मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला; प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय - मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स मराठी बातमी

आयपीएलमध्ये ( IPL 2022 ) पंधराव्या सीजनमध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स ( MI vs LSG ) यांच्यात सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ( Mumbai Indians Won Toss ) आहे.

MI vs LSG
MI vs LSG
author img

By

Published : Apr 16, 2022, 3:24 PM IST

मुंबई - आयपीएलमध्ये ( IPL 2022 ) पंधराव्या सीजनमध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना खेळला जाणार ( MI vs LSG ) आहे. हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर पार पडेल. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ( Mumbai Indians Won Toss ) आहे.

आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स अद्याप एकही सामना जिंकला नाही. मुंबईला पहिल्या पाचही सामन्यात अपयश आले आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मच्या नेतृत्वाखाली संघाला पहिल्या विजयाची आस असणार आहे. तर, संघात कोणत्याही बदलाची शक्यता कमी आहे. मागील सामन्यांचा विचार केला असता फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. मात्र, गोलंदाजांना आपली छाप पाडता आली नाही आहे. टॉस जिंकल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, आम्ही प्रथम गोलंदाजी करण्याचा विचार केला आहे. सामन्यासाठी ही खेळपट्टी चांगली आहे.

तर, दुसरीकडे लखनऊ संघाने आत्तापर्यंत पाच सामने खेळले आहेत. त्यातील तीन सामन्यांत त्यांनी विजय प्राप्त केला आहे. आता लखनऊला मुंबईचा पराभव करुन चौथा विजय मिळवत पॉईंट टेबल मध्ये आघाडी घ्यायची आहे. या सामन्यात कर्णधार केएल राहुलसोबत क्विंटन डी कॉक सलामीला फलंदाजी करताना दिसू शकेल.

मुंबईचा संघ - रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, फॅबियन ऍलेन, जयदेव उनाडकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स.

लखनऊचा संघ - केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, मनिश पांडे, दीपक हुडा, मार्कस स्टॉयनिस, आयुष बदोनी, जेसन होल्डर, कृणाल पंड्या, दुश्मंता चमिरा, अवेश खान, रवी बिश्नोई.

हेही वाचा - IPL 2022: हैदराबादने केला कोलकात्याचा 7 गडी राखून पराभव, मार्कराम, त्रिपाठीची शानदार खेळी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.