ETV Bharat / sports

MI Vs LSG : लखनऊची मुंबईवर मात; 18 धावांनी केला पराभव - केएल राहुलचे शतक

मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात लखनऊने मुंबईवर 18 धावांनी मात केली ( Lucknow Win By 18 Runs Mumbai Indians ) आहे. मुंबईचा हा हंगामातील सहावा पराभव तर, लखनऊचा चौथा विजय आहे.

author img

By

Published : Apr 16, 2022, 10:25 PM IST

मुंबई - आयपीएलमधील ( IPL 2022 ) 26 वा सामना आज ( 16 एप्रिल ) मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात ( MI Vs LSG ) पार पडला. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात लखनऊने मुंबईवर 18 धावांनी मात केली ( Lucknow Win By 18 Runs Mumbai Indians ) आहे. मुंबईचा हा हंगामातील सहावा पराभव तर, लखनऊचा चौथा विजय आहे.

सर्वात प्रथम मुंबईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याच निर्णय घेतला. यावेळी लखनऊने फलंदाजी करताना केएल राहुलने सर्वाधिक धावा चोपल्या. राहुलने 60 चेंडूत नाबाद 103 धावा केल्या या धावा करताना त्याने 5 षटकार आणि 9 चौकार ठोकले. तर, मनीष पांडे (38), क्विंटन डी कॉकने (24), दीपक हुड्डाने (15) आणि मार्कस स्टॉयनिसने (१०) धावा केल्या.

त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबई संघाकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 27 चेंडूत 3 चौकारांच्या सहाय्याने 37 धावा केल्या. त्याव्यतिरिक्त डेवाल्ड ब्रेविसने (31), तिलक वर्मा (26), कायरन पोलार्डने (25), जयदेव उनाडकटने (14), इशान किशसने (13) धावा केल्या. लखनऊच्या 200 धावांचा पाठलाग करताना मुंबई संघाने 9 विकेट्स गमावत 181 धावाच करु शकला. लखनऊ संघ या विजयासह गुणातालिकेत दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. दुसरीकडे मुंबई संघ दहाव्या स्थानी राहिला आहे.

केएल राहुलचे शतक - लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने मुंबई इंडियन्सविरुद्ध शतकी खेळी करत इतिहास रचला आहे. आयपीएलमधील 100 वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या राहुलने 60 चेंडूत 9 चौकार आणि 5 षटकारासह 103 नाबाद धावा केल्या. राहुलचे आयपीएलमधील तिसरे आणि मुंबईविरोधात दुसरे शतक ठोकले आहे.

हेही वाचा - IPL 2022 Updates : दीपक चहर पाठोपाठ केकेआरचा वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.