ETV Bharat / sports

IPL 2022 SRH vs PBKS : नाणेफेक जिंकून हैदराबादचा प्रथम फलंदाजीचा निर्णय; अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन - आयपीएलच्या बातम्या

इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामातील लीग स्टेजमधील अखेरचा म्हणजे 70 वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज ( SRH vs PBKS ) संघात खेळला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसातला सुरुवात होईल.

SRH vs PBKS
SRH vs PBKS
author img

By

Published : May 22, 2022, 7:15 PM IST

मुंबई: आयपीएलच्या 15 व्या हंगामातील लीग स्टेजमधील शेवटचा सामना म्हणजेच 70 वा सामना रविवारी वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज ( Sunrisers Hyderabad vs Punjab Kings ) संघात खेळला जाणार आहे. या सामन्याची नाणेफेक पार पडली आहे. नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आज सनरायझर्स हैदराबाद संघाची धुरा भुवनेश्वर कुमारच्या खांद्यावर आहे.

हा सामना फक्त औपचारिकता असणार आहे. कारण दोन्ही संघ या अगोदरच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. आजचा हा सामना जिंकून हैदराबाद आणि पंजाब हे दोन्ही संघ स्पर्धेचा शेवट चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करतील. पॉइंट टेबलबद्दल बोलायचे झाले, तर हैदराबादचा संघ सहा विजयांसह 12 गुणांसह आठव्या स्थानावर आहे. तर पंजाबचेही 12 गुण आहेत पण चांगल्या नेट रनरेटमुळे ते सातव्या स्थानावर आहेत.

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेअरस्टो, शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, मयंक अग्रवाल (कर्णधार), शाहरुख खान, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हरप्रीत ब्रार, नॅथन एलिस, प्रेरक मंकड, कागिसो रबाडा आणि अर्शदीप सिंग.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, प्रियम गर्ग, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), रोमॅरियो शेफर्ड, वॉशिंग्टन सुंदर, जगदीशा सुचित, भुवनेश्वर कुमार (कर्णधार), फजलहक फारूकी, उमरान मलिक

हेही वाचा - Badminton Player Saina Nehwal : बॅडमिंटनपटू सायना नेहवाल पोहचली केदारनाथ धामला, बाबा केदारचे घेतले दर्शन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.