मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या ( Indian Premier League ) पंधराव्या हंगामातील 37 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स ( Mumbai Indians vs Lucknow Super Giants ) संघात खेळला जाणार आहे. हा सामना रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघ आपला पहिला विजय नोंदवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
-
𝗙𝗜𝗜𝗜𝗜𝗜𝗡𝗔𝗟𝗟𝗬… 𝚆𝙴 𝙷𝙰𝚅𝙴 𝙲𝙾𝙼𝙴 𝙱𝙰𝙲𝙺 𝙷𝙾𝙼𝙴 💙#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #LSGvMI pic.twitter.com/8iuLIq3JiF
— Mumbai Indians (@mipaltan) April 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">𝗙𝗜𝗜𝗜𝗜𝗜𝗡𝗔𝗟𝗟𝗬… 𝚆𝙴 𝙷𝙰𝚅𝙴 𝙲𝙾𝙼𝙴 𝙱𝙰𝙲𝙺 𝙷𝙾𝙼𝙴 💙#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #LSGvMI pic.twitter.com/8iuLIq3JiF
— Mumbai Indians (@mipaltan) April 24, 2022𝗙𝗜𝗜𝗜𝗜𝗜𝗡𝗔𝗟𝗟𝗬… 𝚆𝙴 𝙷𝙰𝚅𝙴 𝙲𝙾𝙼𝙴 𝙱𝙰𝙲𝙺 𝙷𝙾𝙼𝙴 💙#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #LSGvMI pic.twitter.com/8iuLIq3JiF
— Mumbai Indians (@mipaltan) April 24, 2022
आतापर्यंत मुंबई इंडियन्स संघाने ( Mumbai Indians Team ) आयपीएलच्या पंधराव्या हंगामात सात सामने खेळले आहेत. या सात ही सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे हा संघ गुणतालिकेत तळाशी आहे. दुसरीकडे लखनौ सुपरजायंट्स संघाने देखील सात सामने खेळले आहेत. त्यापैकी 4 सामन्यात विजय, तर तीन सामन्यात पराभव पत्करला आहे. त्यामुळे या संघाचे 8 गुण आहेत. तसेच हा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. या सामन्यात आतापर्यंतच्या कामगिरीनुसार लखनौ संघाचे पारडे मुंबईपेक्षा जड दिसत आहे.
-
#LSGvsMI matlab GAME ON! #AbApniBaariHai💪#IPL2022 🏆 #bhaukaalmachadenge #LucknowSuperGiants #TataIPL #LSG2022 pic.twitter.com/CVqVhpDohg
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#LSGvsMI matlab GAME ON! #AbApniBaariHai💪#IPL2022 🏆 #bhaukaalmachadenge #LucknowSuperGiants #TataIPL #LSG2022 pic.twitter.com/CVqVhpDohg
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 24, 2022#LSGvsMI matlab GAME ON! #AbApniBaariHai💪#IPL2022 🏆 #bhaukaalmachadenge #LucknowSuperGiants #TataIPL #LSG2022 pic.twitter.com/CVqVhpDohg
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 24, 2022
लखनौ ( Lucknow Super Giants Team ) चांगल्या स्थितीत दिसत आहे. परंतु शेवटच्या सामन्यात त्यांना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) कडून 18 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. मात्र, लखनौने पहिल्या सत्राच्या सामन्यात मुंबईचा 18 धावांनी पराभव केला होता, त्यामुळे ते मनोबल वाढवत मैदानात उतरतील. मुंबईने तुकड्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पण एक युनिट म्हणून कामगिरी करण्यात ते अपयशी ठरले आहेत. एका मोसमात पहिले सात सामने हरणारा मुंबई हा पहिला संघ ठरला आहे. कर्णधार रोहित शर्माला कुठे गडबड सुरू आहे, हे कळत नसल्याचे दिसते.
संघाच्या शेवटच्या सामन्यानंतर रोहित म्हणाला होता, कोणाकडे बोट दाखवणे कठीण आहे, पण आम्ही सामन्याची सुरुवात चांगली करत नाही. जर तुम्ही लवकर विकेट गमावल्या तर ते नुकसान आहे. मुंबईच्या खराब कामगिरीचे एक कारण म्हणजे सलामीवीर रोहित आणि इशान किशन यांचा खराब फॉर्म. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध दोघांना खातेही उघडता आले नाही. या स्पर्धेत रोहितने 114 आणि ईशानने 191 धावा केल्या आहेत.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), अनमोलप्रीत सिंग, राहुल बुद्धी, रमणदीप सिंग, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, अर्जुन तेंडुलकर, बेसिल थंपी, हृतिक शोकीन, जसप्रीत बुमराह, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, मुरुगन अश्विन, रिले मेरिथ , टायमल मिल्स, अर्शद खान, डॅनियल सॅम्स, डेवाल्ड ब्रेविस, फॅबियन ऍलन, किरॉन पोलार्ड, संजय यादव, आर्यन जुयाल आणि इशान किशन.
लखनौ सुपर जायंट्स: केएल राहुल (कर्णधार), मनन वोहरा, एविन लुईस, मनीष पांडे, क्विंटन डी कॉक, रवी बिश्नोई, दुष्मंथा चमिरा, शाहबाज नदीम, मोहसीन खान, मयंक यादव, अंकित राजपूत, आवेश खान, अँड्र्यू टाय, मार्कस स्टॉइनिस, काइल मेयर्स, करण शर्मा, कृष्णप्पा गौतम, आयुष बडोनी, दीपक हुडा, कृणाल पंड्या आणि जेसन होल्डर.
हेही वाचा - KKR Vs GT : आंद्रे रसेलची खेळी व्यर्थ; गुजरातचा 8 धावांनी विजय