हैदराबाद: मंगळवारी आयपीएल 2022 ( IPL 2022 ) मधील तेरावा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore ) संघात खेळला गेला. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात बंगळुरुने राजस्थानवर चार विकेट्सने विजय मिळवला. त्याचबरोबर त्यांनी आपला दुसरा विजय नोंदवताना राजस्थानच्या विजयी रथाला ब्रेक लावला. तसेच या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने गुणतालिकेत सहाव्या स्थानी झेप घेतली आहे.
-
What a sensational win! 👌 👌
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Second victory on the bounce & 2⃣ more points in the bag for @RCBTweets as they beat #RR by 4⃣ wickets. 👏 👏
Scorecard ▶️ https://t.co/mANeRaZc3i #TATAIPL | #RRvRCB pic.twitter.com/VJMRJ1fhtP
">What a sensational win! 👌 👌
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2022
Second victory on the bounce & 2⃣ more points in the bag for @RCBTweets as they beat #RR by 4⃣ wickets. 👏 👏
Scorecard ▶️ https://t.co/mANeRaZc3i #TATAIPL | #RRvRCB pic.twitter.com/VJMRJ1fhtPWhat a sensational win! 👌 👌
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2022
Second victory on the bounce & 2⃣ more points in the bag for @RCBTweets as they beat #RR by 4⃣ wickets. 👏 👏
Scorecard ▶️ https://t.co/mANeRaZc3i #TATAIPL | #RRvRCB pic.twitter.com/VJMRJ1fhtP
दरम्यान त्याचवेळी दिल्ली कॅपिटल्सचा संघ एका स्थानाने घसरून सातव्या स्थानावर आला आहे. जास्तीत जास्त संघांनी तीन सामने खेळले आहेत आणि आरसीबी विरुद्ध राजस्थान यांच्यात झालेल्या सामन्यानंतर, पहिल्या ते सहाव्या स्थानापर्यंतच्या सर्व 6 संघांचे 4 गुण आहेत.
राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत अव्वल स्थानी कायम - राजस्थानचा संघ ( Rajasthan Royals ) (1.218) चांगल्या धावगतीच्या आधारावर पराभव पत्करूनही अव्वल स्थानावर आहे. श्रेयस अय्यरचा कोलकाता नाईट रायडर्स (0.843) राजस्थाननंतर दुसऱ्या स्थानावर आहे. केकेआरनंतर, आयपीएलच्या पंधराव्या मोसमात पदार्पण करणाऱ्या गुजरात टायटन्सने (0.495) तिसरे स्थान पटकावले आहे. पंजाब किंग्ज (0.238) चौथ्या स्थानावर आहेत, त्यानंतर आणखी एक नवीन संघ लखनौ सुपर जायंट्स (0.193) आणि आरसीबी (0.159) सहाव्या स्थानावर आहेत. दिल्ली (0.065) 2 गुणांसह 7 व्या स्थानावर आहे.
आयपीएलच्या इतिहासातील दोन सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) (-1.029) आणि चेन्नई सुपर किंग्स (-1.251) अजून आपले खातेही विजयाचे खाते उघडू शकले नाहीत. दोघेही 8व्या आणि 9व्या स्थानावर आहेत. सनरायझर्स हैदराबाद (-1.825) 10व्या स्थानावर आहे.
जोस बटलर ऑरेंज कॅपचा मानकरी - राजस्थानच्या जोस बटलरने ( Batter Jose Butler ) आरसीबीविरुद्ध नाबाद 70धावांची खेळी केली आणि यासह तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. बटलरने तीन सामन्यांत 205 धावा केल्या आहेत. यासोबतच इशान किशनने दोन सामन्यांत 135 धावा करत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. उमेश यादवच्या नावावर सध्या पर्पल कॅप आहे. त्याने तीन सामन्यांत आठ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर युजवेंद्र चहल सात विकेटसह दुसऱ्या स्थानावर आहे.
हेही वाचा - London Spirit Team : शेन वॉर्नच्या जागी ट्रेव्हर बेलिस लंडन स्पिरिट संघाचे प्रशिक्षकपद भूषवणार