पुणे: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील चौदावा सामना पुणे येथील एमसीए स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders vs Mumbai Indians ) संघात बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून सुरु होणार आहे. मुंबई इंडियन्स संघाचा हा तिसरा सामना आहे, तर कोलकाता नाईट रायडर्स संघाचा चौथा सामना आहे. मुंबईने आपले पहिले दोन ही सामने गमावले आहेत. त्यामुळे आपल्या विजयाच्या शोधात आहेत. त्याचबरोबर कोलकाता संघाने तीनपैकी दोन सामने जिंकून गुणतालिकेत दुसऱया क्रमांकावर विराजमान आहेत.
आतापर्यंत आयपीएल इतिहासात या दोन्ही संघात 29 सामने झाले आहेत. त्यापैकी 22 सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर सात सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने विजय मिळवला आहे.
-
Tell us why you're a RO fan without telling us why you're a RO fan! 😌💙
— Mumbai Indians (@mipaltan) April 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
We'll start 👇💥#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians @ImRo45 pic.twitter.com/CGg21FfPCG
">Tell us why you're a RO fan without telling us why you're a RO fan! 😌💙
— Mumbai Indians (@mipaltan) April 6, 2022
We'll start 👇💥#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians @ImRo45 pic.twitter.com/CGg21FfPCGTell us why you're a RO fan without telling us why you're a RO fan! 😌💙
— Mumbai Indians (@mipaltan) April 6, 2022
We'll start 👇💥#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians @ImRo45 pic.twitter.com/CGg21FfPCG
या सामन्यात ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स ( Fast bowler Pat Cummins ) देखील केकेआरसाठी उपलब्ध असेल, जो जबरदस्त खेळ दाखवत आहे. ज्यामुळे संघाचे गोलंदाजी आक्रमण आणखी मजबूत दिसत आहे. उमेश यादव आणि सुनील नरेनसह कमिन्सची उपस्थिती मुंबईच्या फलंदाजांसाठी अडचणी निर्माण करेल. फलंदाजीत संघाला कर्णधार श्रेयस अय्यर ( Captain Shreyas Iyer ) आणि सलामीवीर व्यंकटेश अय्यर यांच्याकडून चांगल्या योगदानाची अपेक्षा असेल. गेल्या सामन्यात एकहाती विजय मिळवणाऱ्या आंद्रे रसेलचे फॉर्ममध्ये पुनरागमन ही संघासाठी खूप आनंदाची बातमी आहे. मात्र, अनुभवी अजिंक्य रहाणे ( Experienced Batter Ajinkya Rahane ) आणि नितीश राणा यांचा खराब फॉर्म निश्चितच चिंतेचा विषय असून विरोधी गोलंदाज त्याचा फायदा उठवू शकतात.
आयपीएलच्या प्रत्येक हंगामात संथ सुरुवात करणाऱ्या मुंबई इंडियन्सला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. सलामीवीर रोहित शर्माची ( Opener Rohit Sharma ) बॅट टॉप ऑर्डरमध्ये शांत आहे. सूर्यकुमार यादवच्या आगमनाने फलंदाजी निश्चितच बळकट होणार असली, तरी टीम डेव्हिड आणि किरॉन पोलार्ड हे पॉवर हिटर पूर्णपणे फॉर्मात नाहीत. युवा तिलक वर्माने चांगली कामगिरी केली आहे आणि केकेआरच्या मजबूत फिरकी आक्रमणाविरुद्ध त्याची चाचणी घेतली जाऊ शकते. जसप्रीत बुमराह आणि टायमल मिल्स गोलंदाजांच्या विभागात चांगली कामगिरी करत आहेत. पण इतर गोलंदाज तितकेसे प्रभावी दिसत नाहीत. अशा स्थितीत केकेआरविरुद्ध संघाची कामगिरी कशी होते, हे पाहावे लागेल.
कोलकाता नाईट रायडर्स : आरोन फिंच, अभिजित तोमर, अजिंक्य रहाणे, बाबा इंद्रजीत, नितीश राणा, प्रथम सिंग, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, अशोक शर्मा, पॅट कमिन्स, रसिक दार, शिवम मावी, टिम साऊदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती, अमन खान, आंद्रे रसेल, अनुकुल रॉय, चमिका करुणारत्ने, मोहम्मद नबी, रमेश कुमार, सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, सॅम बिलिंग्ज आणि शेल्डन जॅक्सन.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), अनमोलप्रीत सिंग, राहुल बुद्धी, रमणदीप सिंग, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, अर्जुन तेंडुलकर, बेसिल थंपी, हृतिक शोकीन, जसप्रीत बुमराह, जयदेव उनाडकट, जोफ्रा आर्चर, मयंक मार्कंडे, मुरुगन अश्विन , रिले मेरेडिथ, टायमल मिल्स, अर्शद खान, डॅनियल सॅम्स, डेवाल्ड ब्रेविस, फॅबियन ऍलन, किरॉन पोलार्ड, संजय यादव, आर्यन जुयाल आणि इशान किशन.
हेही वाचा - Maharashtra Kesari Competition : महाराष्ट्र केसरी'ला एखादं पद द्यावं - रामराजे नाईक निंबाळकर यांची मागणी