पुणे: राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ( Rajasthan Royals vs Sunrisers Hyderabad ) संघात आयपीएलच्या 15 व्या हंगामाचा पाचवा सामना मंगळवारी पार पडला. हा सामना पुणे येथे एमसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्स सनरायझर्स हैदराबाद संघावर 61 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे हैदराबादला पंधराव्या हंगामात पहिलाच पराभवाचा धक्का बसला. त्यानंतर सामना समाप्तीनंतर हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनला ( Captain Ken Williamson ) दुसरा मोठा धक्का बसला आहे. कारण त्याच्यावर सामन्यात षटकांची गती कमी राखल्याने मोठी कारवाई करण्यात आली आहे.
हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनवर षटकांची गती संथ राखल्यामुळे कारवाई करताना, त्याला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात ( Ken Williamson fined Rs 12 lakh ) आला आहे. तत्पुर्वी या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्स संघाने निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 210 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना सनराइजर्स हैदराबाद संघ 7 विकेट्स गमावून फक्त 149 धावाच करू शकला. राजस्थान रॉयल्स संघाकडून युझवेंद्र चहलने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर प्रसिद्ध कृष्णा आणि ट्रेंट बोल्टने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
कर्णधार केन विल्यमसनवर दंडात्मक कारवाई ( Punitive action against Ken Williamson ) -
सनरायझर्स हैदराबाद संघाने राजस्थान रॉयल्स विरुद्धचा सामना गमावला. त्यानंतर ही या संघाच्या अडचणीत काही कमी राहिली नाही. या सामन्यात षटकांची गती संथ राखल्यामुळे कर्णधार केन विल्यमसनला 12 लाखांचा दंड ठोठावला आहे. याबाबतची माहिती बीसीसीआयने जारी केलेल्या आपल्या एका निवेदनात याबाबत माहिती दिली आहे. या मोसमातील त्यांची ही पहिली चूक आहे, त्यामुळे केन विल्यमसनला आयपीएलच्या आचारसंहितेनुसार 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
तसेच यानंतर ही चूक पुन्हा झाली, तर त्याला 24 लाखांचा दंड भरावा लागेल. त्यानंतर तिसऱ्यांदा ही चूक झाली, तर 30 लाखांचा दंड भरुन एका सामन्यात त्याच्यावर बंदी असेल. तसेच दुसरऱ्यांदा ही चूक झाल्यावर कर्णधाराबरोबर खेळाडूंना देखील दंड केला जाईल.
हेही वाचा - SRH vs RR: 'IPL'च्या 5 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून हैदराबादचा 61 धावांनी पराभव