मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या ( Indian Premier League ) पंधराव्या हंगामातील 51 वा सामना शुक्रवारी (6 मे) ब्रेबॉर्न स्टेडियम मुंबई येथे खेळला जाणार आहे. हा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स ( Gujarat Titans vs Mumbai Indians ) संघात खेळला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसातला सुरुवात होणार आहे. गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन आयपीएलच्या पंधराव्या हंगामात पहिल्यांदाच आमने सामने येत आहेत.
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात गुजरात टायटन्स संघाने ( Gujarat Titans Team) आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. त्यापैकी 8 सामन्यात गुजरातने विजय मिळवला आहे, तर दोन सामन्यात संघाला पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे या संघाकडे 16 गुण असून संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानी आहे. त्याचबरोबर दुसरीकडे मुंबई इंडियन्स संघाने ( Mumbai Indians Team ) आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. यापैकी 8 सामन्यात पराभव तर एका सामन्यात विजय मिळवला आहे, म्हणून या संघाकडे दोन गुण आहेत आणि हा संघ गुणतालिकेत 10 व्या स्थानी आहे.
-
We caught up with our South African duo before #GTvMI! @atherenergy
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Here's what they said about handling all the pressure and anticipation 🙌#SeasonOfFirsts #AavaDe pic.twitter.com/qLvRdqt928
">We caught up with our South African duo before #GTvMI! @atherenergy
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 6, 2022
Here's what they said about handling all the pressure and anticipation 🙌#SeasonOfFirsts #AavaDe pic.twitter.com/qLvRdqt928We caught up with our South African duo before #GTvMI! @atherenergy
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 6, 2022
Here's what they said about handling all the pressure and anticipation 🙌#SeasonOfFirsts #AavaDe pic.twitter.com/qLvRdqt928
कर्णधार हार्दिक पांड्या ( Captain Hardik Pandya ) हा गुजरातच्या फलंदाजीचा आधारस्तंभ आहे, त्याने 309 धावा केल्या आहेत. मात्र सलग दोन सामन्यांत तो अपयशी ठरला. त्यामुळे तो मोठी खेळी खेळण्यासाठी उत्सुक असेल. मिलर आणि सिक्सर किंग तेवातिया आणि राशीदही अपयशानंतर स्वत:ला सिद्ध करण्यासाठी उत्सुक असतील. मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन, अल्झारी जोसेफ आणि रशीद यांच्या उपस्थितीमुळे गुजरात टायटन्सकडे यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वात धोकादायक आक्रमण आहे. शमीने गेल्या सामन्यात धावां दिल्या असल्या तरी त्याने नवीन चेंडूसह शानदार कामगिरी केली आहे. फर्ग्युसनची अतिरिक्त वेगवान गोलंदाजीची क्षमता ही कोणत्याही संघाच्या फलंदाजीसाठी चिंतेची बाब असेल.
-
Ishan 𝐊𝐄𝐄𝐏𝐈𝐍𝐆 it just perfect 🧤#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians @ishankishan51 @JockMore MI TV pic.twitter.com/0UJmG5y0Ki
— Mumbai Indians (@mipaltan) May 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Ishan 𝐊𝐄𝐄𝐏𝐈𝐍𝐆 it just perfect 🧤#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians @ishankishan51 @JockMore MI TV pic.twitter.com/0UJmG5y0Ki
— Mumbai Indians (@mipaltan) May 6, 2022Ishan 𝐊𝐄𝐄𝐏𝐈𝐍𝐆 it just perfect 🧤#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians @ishankishan51 @JockMore MI TV pic.twitter.com/0UJmG5y0Ki
— Mumbai Indians (@mipaltan) May 6, 2022
कर्णधार रोहित शर्मा ( Captain Rohit Sharma ) आणि इशानचा खराब फॉर्म स्पर्धेत कायम आहे तर किरॉन पोलार्डला आतापर्यंतच्या हंगामात त्याच्या फिनिशरच्या भूमिकेला न्याय देता आलेला नाही. गोलंदाजीत मुंबईचा संघ आपल्या सर्वोत्तम कामगिरीच्या जवळ दिसत नाही. जसप्रीत बुमराह किफायतशीर असला तरी पण विकेट्स घेण्याक त्याला अपयश आले आहे. जे संघासाठी सर्वात वेदनादायी ठरले आहे. डॅनियल सॅम्स आणि रिले मेरिडिथ यांनी मधल्या काळात चांगली कामगिरी केली आणि मुंबईकडे बुमराहशिवाय कोणताही विश्वसनीय गोलंदाज नाही. मात्र आता उर्वरित सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स इतर संघांची समीकरणे बिघडवण्याचा प्रयत्न करेल.
गुजरात टायटन्स : अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, गुरकीरत सिंग, बी साई सुदर्शन, शुभमन गिल, हार्दिक पंड्या (कर्णधार), राहुल तेवतिया, विजय शंकर, मॅथ्यू वेड, रहमानउल्ला गुरबाज, वृद्धिमान साहा, अल्झारी जोसेफ, दर्शन नालकांडे, डोमिनिक ड्रेकस यादव, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, नूर अहमद, प्रदीप सांगवान, राशिद खान, रवी श्रीनिवासन, साई किशोर, वरुण आरोन आणि यश दयाल.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), अनमोलप्रीत सिंग, राहुल बुद्धी, रमणदीप सिंग, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, अर्जुन तेंडुलकर, बेसिल थंपी, हृतिक शोकीन, जसप्रीत बुमराह, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, मुरुगन अश्विन, रिले मेरिथ , टायमल मिल्स, अर्शद खान, डॅनियल सॅम्स, डेवाल्ड ब्रेविस, फॅबियन ऍलन, किरॉन पोलार्ड, संजय यादव, आर्यन जुयाल आणि इशान किशन.
हेही वाचा - IPL 2022 Updates : मुंबई इंडियन्स संघात टायमल मिल्सच्या जागी 'या' खेळाडूची वर्णी