पुणे: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore ) आणि चेन्नई सुपर किंग्ज ( Chennai Super Kings ) यांच्यात चुरशीचा सामना पाहायला मिळाला. दुसरीकडे, स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या कॅमेरामॅनने एक रोमँटिक क्षण कॅमेऱ्यात कैद केला. ज्यामध्ये एक मुलगी एका क्रिकेट चाहत्याला प्रपोज करताना दिसली. असे प्रसंग कधीही न चुकवणाऱ्या कॅमेरामनने तो क्षण खूप छान कव्हर केला. यानंतर या जोडप्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
सीएसकेच्या डावाच्या 11व्या षटकात, एक मुलगी आरसीबीची जर्सी घातलेल्या चाहत्याला प्रपोज करताना दिसली. कॅमेऱ्याने मुलगी गुडघे टेकून अंगठी घालतानाचे दृश्य कैद केली. त्याचवेळी स्टेडियममध्ये उपस्थित असलेले प्रेक्षकही हे दृश्य पाहून अचंबित झाले आणि त्यांनी टाळ्यांच्या गजरात दोघांचे स्वागत करून हा क्षण रोमांचक केला. या जोडप्याने एकमेकांना मिठी मारली आणि एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली. हा क्षण कॅमेऱ्यात कैद होताच त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
Santhosham ga undandi🙌🏻 pic.twitter.com/houNPcolYW
— Varma (@Varma____) May 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Santhosham ga undandi🙌🏻 pic.twitter.com/houNPcolYW
— Varma (@Varma____) May 4, 2022Santhosham ga undandi🙌🏻 pic.twitter.com/houNPcolYW
— Varma (@Varma____) May 4, 2022
माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने सोशल मीडियावर या दृश्याला नवा ट्विस्ट दिला आणि सांगितले की, तरुणीने आरसीबी फॅनला तिचा जीवनसाथी म्हणून निवडण्याचा योग्य निर्णय घेतला. जाफरने पुढे लिहिले की, स्मार्ट गर्ल आरसीबी फॅनला प्रपोज करत आहे. जर तो आरसीबीशी एकनिष्ठ असेल तर तो नक्कीच त्याच्या जोडीदाराशीही एकनिष्ठ राहू शकतो. दोघांनाही हार्दिक शुभेच्छा.
-
Smart girl proposing an RCB fan. If he can stay loyal to RCB, he can definitely stay loyal to his partner 😉 Well done and a good day to propose 😄 #RCBvCSK #IPL2022 pic.twitter.com/e4p4uTUaji
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) May 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Smart girl proposing an RCB fan. If he can stay loyal to RCB, he can definitely stay loyal to his partner 😉 Well done and a good day to propose 😄 #RCBvCSK #IPL2022 pic.twitter.com/e4p4uTUaji
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) May 4, 2022Smart girl proposing an RCB fan. If he can stay loyal to RCB, he can definitely stay loyal to his partner 😉 Well done and a good day to propose 😄 #RCBvCSK #IPL2022 pic.twitter.com/e4p4uTUaji
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) May 4, 2022
दरम्यान, आरसीबीचा गोलंदाज हर्षल पटेलने तीन आणि ग्लेन मॅक्सवेलने दोन गडी बाद केले. गोलंदाजांच्या बळावर संघाने बुधवारी एमसीए स्टेडियमवर गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा 13 धावांनी पराभव केला. महिपाल लोमरोर (42) आणि दिनेश कार्तिक (नाबाद 26) यांच्या खेळीनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आठ गडी गमावून 173 धावा केल्या. त्याचवेळी लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जला 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 160 धावा करता आल्या. या विजयासह बंगळुरू आता आयपीएलच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे, तर चेन्नई नवव्या स्थानावर आहे.
हेही वाचा - खेलो इंडियामध्ये रोलबॉलचा समावेश करण्यासाठी सहकार्य करू केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचे आश्वासन