अहमदाबाद: रविवारी रात्री आठला आयपीएल 2022 चा अंतिम सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स ( IPL 2022 Final RR vs GT ) संघात खेळला जाणार आहे. या सामन्यात राशिद खान आणि जोस बटलच्या ( Opener Jos Buttler ) कामगिरीवर सर्वांचे लक्ष असणार आहे. कारण या दोन खेळाडूंच्या कामगिरीवर दोन्ही संघाचे यश अवलंबून आहे. तसेच या सामन्यापूर्वी माजी क्रिकेटर संजय मांजरेकर ( Former cricketer Sanjay Manjrekar ) यांनी दोन्ही संघाला एक महत्वाचा सल्ला दिला आहे.
राजस्थान रॉयल्सचा ( Rajasthan Royals ) स्फोटक फलंदाज जोस बटलरला गुजरात टायटन्सचा फिरकीपटू रशीद खानविरुद्ध अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल आणि रविवारी होणाऱ्या फायनलमध्ये वेगवान धावा करण्यासाठी दुसऱ्या गोलंदाजाला लक्ष्य करावे लागेल, असे भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर ( Manjrekar comment on Rashid and Jos ) याला वाटते. राशीदची अचूकता हे त्याच्या गोलंदाजीचे वैशिष्ट्य आहे आणि त्याने या मोसमात काही सामन्यांमध्ये विकेट न घेता, 15 सामन्यांमध्ये 6.74 च्या सर्वोत्तम इकॉनॉमी रेटने 18 विकेट घेतल्या आहेत. तर राजस्थानचा बटलर या मोसमात 824 धावांसह ऑरेंज कॅपमच्या शर्यतीती अव्वल स्थानावर आहे. स्फोटक फलंदाज अफगाणिस्तानच्या फिरकीपटूविरुद्ध धोका पत्करू शकत नाहीत, कारण रॉयल्सच्या दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची आशा इंग्लंडच्या खेळाडूच्या कामगिरीवर अवलंबून आहे.
मांजरेकर ईएसपीएनक्रिकइंफोच्या आयपीएल T20 टाइमवर म्हणाले, बटलरने रशीदच्या अचूकतेबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे. "गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) पहिल्या सहा षटकांमध्ये राशीद खानचा ( Spinner Rashid Khan ) वापर करू शकते. कारण तो स्टंप टू स्टंप गोलंदाजी करतो आणि बटलर सरळ स्टंपवर येणा-या चेंडूमुळे अडचणीत येतो." मांजरेकर म्हणाले राजस्थानने राशिदविरुद्ध सावधपणे खेळावे.
गुजरात टायटन्ससाठी, मांजरेकर म्हणाले की त्यांना अंतिम फेरीत डावपेच बदलण्याची गरज आहे आणि अल्झारी जोसेफच्या जागी सीम बॉलर लॉकी फर्ग्युसनचा ( Seam bowler Lucky Ferguson ) समावेश करणे आवश्यक आहे. कारण वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजाने क्वालिफायर 1 मध्ये दोन षटकात 27 धावा दिल्या होत्या. मांजरेकर म्हणाले, आयपीएलच्या अधिक अनुभवामुळे लॉकीला संधी मिळू शकते. त्यामुळे मी त्या बदलाची वाट पाहत आहे.
हेही वाचा - Gt Director Vikram Solanki : हार्दिक पांड्याकडे जिंकण्याची क्षमता जीटी संचालक सोलंकी