ETV Bharat / sports

IPL 2022 DC vs KKR : नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय - sreyas iyer

आयपीएल 2022 चा 41 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स ( DC vs KKR ) यांच्यात गुरुवारी (28 एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या अगोदर दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसातला सुरूवात होईल.

DC vs KKR
DC vs KKR
author img

By

Published : Apr 28, 2022, 7:24 PM IST

मुंबई: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 41 वा सामना गुरुवारी (28 एप्रिल) वानखेडे मैदानावर खेळला जाणार आहे. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals vs Kolkata Knight Riders ) संघात साडेसातला सुरु होईल. त्या अगोदर दोन्ही संघाचे कर्णधार रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांच्यात नाणेफक पार पडली आहे. नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सच्या रिषभ पंतने गोलंदाजीचा निर्णय घेतला ( Delhi Capitals opt to bowl ) आहे.

या हंगामतील या दोन संघांचा एकमेकांविरुद्धचा दुसरा सामना आहे. या अगोदर झालेल्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने कोलकाता नाईट रायडर्सवर 44 धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली ( Captain Shreyas iyer ) कोलकाता बदला घेण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल.

कोलकाता नाईट रायडर्स संघाने ( Kolkata Knight Riders Team ) या हंगामात आतापर्यंत आठ सामने खेळले आहेत. त्यापैकी पाच सामन्यात पराभव, तर तीन सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे हा संघ गुणतालिकेत सहा गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्सने ( Delhi Capitals Team ) सात सामने खेळले आहेत. त्यापैकी चार सामन्यात पराभव आणि तीन सामन्यात विजय मिळवला आहे. म्हणून हा संघ गुणतालिकेत सहा गुणांसह सातव्या स्थानी आहे.

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हेड टु हेड -

1. दोन्ही संघ आयपीएलमध्ये एकूण 30 वेळा आमनेसामने आले आहेत. यादरम्यान दिल्लीने 13 सामने जिंकले आहेत, तर केकेआरने 16 सामने जिंकले आहेत. एक सामना रद्द झाला आहे.

2. गेल्या मोसमात दोन्ही संघ तीनदा आमनेसामने आले. यादरम्यान केकेआरने दोनदा, तर डीसीने एक सामना जिंकला. त्याच वेळी, या हंगामात एकदा दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने केकेआरचा पराभव केला आहे.

3. नितीश राणाने केकेआरकडून दिल्लीविरुद्ध सर्वाधिक 312 धावा केल्या आहेत.

4. केकेआर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या सध्याच्या खेळाडूंमध्ये पृथ्वी शॉने सर्वाधिक 392 धावा केल्या आहेत.

5. सुनील नरेनने आयपीएलमध्ये दिल्लीविरुद्ध केकेआरकडून सर्वाधिक 21 विकेट्स घेतल्या आहेत.

6. दिल्ली कॅपिटल्ससाठी केकेआर विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात कुलदीप यादवने 4 विकेट घेतल्या होत्या.

कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): आरोन फिंच, सुनील नरेन, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, बाबा इंद्रजित (डब्ल्यू), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, उमेश यादव, टीम साऊदी आणि हर्षित राणा.

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार), ललित यादव, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान आणि चेतन साकारिया.

हेही वाचा - England New Test Captain : ईसीबीची मोठी घोषणा; बेन स्टोक्स इंग्लंडच्या कसोटी संघाचा नवा कर्णधार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.