मुंबई - आयपीएल 45 वी लढत लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्या झाली होती. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात 6 धावांनी लखनौ संघ विजयी झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सला पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर, कर्णधार केएल राहुलच्या नेतृत्वाखाली लखनौने 7 विजय प्राप्त करत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
नाणेफेक जिंकून लखनौने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातील कर्णधार केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक फलंदाजीसाठी उतरले. शार्दुल ठाकूरने डी कॉकला बाद केले. त्याने 23 धावा केल्या. त्यानंतर राहुल आाणि दीपक हुड्डाने 95 धावांची भागिदारी केली. दीपकला शार्दुलने बाद केले. दीपकने 34 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 52 धावा केल्या. तर राहुल 19 व्या षटकात बाद झाला. त्याने 51 चेंडूत 5 षटकार आणि 4 चौकारासोबत 77 धावा केल्या. तर, मार्कस स्टोइनिस आणि क्रुणाल पंड्या यांनी अनुक्रमे १७ आणि ९ धावांचे योगदान दिले. यामुळे लखनौने ३ बाद १९५ धावसंख्या उभा केली. तर, दिल्लीकडून शार्दूल वगळता एकही गोलंदाजाने विकेट घेतली नाही.
प्रत्त्युत्तरात उतरलेल्या दिल्लीची सुरुवात खबार झाली. सलामीवीर पृथ्वी शॉ दुसऱ्या षटकात ५ धावांवर बाद झाला. तर, तिसऱ्या षटकात डेव्हिड वॉर्नरने देखील ३ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या मिचेल मार्श आणि कर्णधार ऋषभ पंत यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी करून दिली. त्यातच मिचेल बाद झाला, त्याने २० चेंडूत ३ षटकार आणि ३ चौकारांसह ३७ धावा केल्या. मार्शनंतर आलेला ललित यादवने (3), पंतला मोहसीन खानने बाद केले. पंतने 30 चेंडूत 44 धावा केल्या. पंतनंतर आलेल्या रोवमॅन पॉवेल आणि अक्षर पटेल या दोघांकडून दिल्ली आशा होती. मात्र, 17 व्या षटकात पॉवेल बाद झाल्यानंतर दिल्लीच्या आशा मावळल्या. नंतर आलेल्या फलंदाजांना विजयासाठीच्या धावा ठोकत्या आल्या नाही. दिल्लीने 20 षटकात 7 बाद 189 धावा केल्या.
हेही वाचा - IPL 2022: विराटचे आयपीएल कारकिर्दीतील 43 वे अर्धशतक पूर्ण! मोहम्मद शमीकडून अभिनंदन