मुंबई: गुरुवारी झालेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 41 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders ) संघावर चार विकेट्सने विजय ( Delhi Capitals won by 4 wickets ) मिळवला. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघ पाचव्या विजयासह गुणतालिकेत पाचव्या स्थानी पोहचला आहे. प्रथम पलंदाजी करताना कोलकाता संघाने 9 बाद 146 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्लीने 6 बाद 150 धावा करत विजय मिळवला. यानंतर मॅच विनिंग पारी खेळणाऱ्या रोवमॅन पॉवेलने प्रतिक्रिया ( Reaction by Rowman Powell ) दिली आहे.
-
A return to winning ways for the Delhi Capitals! 👏 👏
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The Rishabh Pant-led side beat #KKR by 4 wickets & seal their 4⃣th win of the #TATAIPL 2022. 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/jZMJFLuj4h #DCvKKR pic.twitter.com/QCQ4XrJn0P
">A return to winning ways for the Delhi Capitals! 👏 👏
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2022
The Rishabh Pant-led side beat #KKR by 4 wickets & seal their 4⃣th win of the #TATAIPL 2022. 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/jZMJFLuj4h #DCvKKR pic.twitter.com/QCQ4XrJn0PA return to winning ways for the Delhi Capitals! 👏 👏
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2022
The Rishabh Pant-led side beat #KKR by 4 wickets & seal their 4⃣th win of the #TATAIPL 2022. 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/jZMJFLuj4h #DCvKKR pic.twitter.com/QCQ4XrJn0P
147 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीने एका क्षणी 84 धावांत पाच विकेट गमावल्या होत्या. येथून रोव्हमॅन पॉवेल (33*) याने अक्षर पटेल (24) सोबत सहाव्या विकेटसाठी 29 धावा जोडल्या आणि त्यानंतर शार्दुल ठाकूर ( Shardul Thakur ) (8*) सोबत सातव्या विकेटसाठी 37 धावांची भागीदारी करत संघाला 19 षटकात शेवटच्या चेंडूवर षटकार खेचत चार गडी बाद राखून विजय मिळवून दिला.
सामना समाप्तीनंतर प्रतिक्रिया देताना रोव्हमॅन पॉवेल म्हणाला, “काही दडपण होते, पण माझा विकेटवर विश्वास होता. माझ्या मते ती चांगली विकेट होती. ही अशी विकेट होती जिथे तुम्हाला क्रीजवर स्थिरावण्यासाठी पाच ते सात चेंडू लागतील. या दरम्यान खेळण्यासाठी तुम्हाला क्रॉस शॉट खेळायचा नव्हता. पण ही विकेट चांगली होती.
-
Blessing your feed with 𝐑𝐏² at this hour to virtually hug you fans goodnight 💙#YehHaiNayiDilli | #IPL2022#TATAIPL | #IPL | #DelhiCapitals | #DCvKKR | @RishabhPant17 | @ravipowell52 pic.twitter.com/LqXBmVCuqo
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Blessing your feed with 𝐑𝐏² at this hour to virtually hug you fans goodnight 💙#YehHaiNayiDilli | #IPL2022#TATAIPL | #IPL | #DelhiCapitals | #DCvKKR | @RishabhPant17 | @ravipowell52 pic.twitter.com/LqXBmVCuqo
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 28, 2022Blessing your feed with 𝐑𝐏² at this hour to virtually hug you fans goodnight 💙#YehHaiNayiDilli | #IPL2022#TATAIPL | #IPL | #DelhiCapitals | #DCvKKR | @RishabhPant17 | @ravipowell52 pic.twitter.com/LqXBmVCuqo
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 28, 2022
तो पुढे म्हणाला, 'विकेटवर बॉल फिरत नव्हता किंवा विकेटवर कोणतीही हालचाल होत नव्हती, त्यामुळे मला खेळपट्टीवर आणि स्वतःवर विश्वास होता. आम्हाला स्कोअर लहान वाटला. आम्ही म्हणालो की, जर आम्ही लवकर विकेट गमावल्या नाहीत आणि पॉवरप्लेच्या शेवटी 40 किंवा 50 धावांवर दोन विकेट गमावल्या तर आम्हाला गती कायम ठेवायची आहे आणि आम्ही मजबूत स्थितीत असू.
केकेआरविरुद्ध विजयाच्या दडपणातून संघाला बाहेर काढण्याबाबत पॉवेल म्हणाला, ‘‘आजचा डाव महत्त्वाचा होता. यामुळे मला वैयक्तिक आत्मविश्वास मिळाला आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला मी चांगली कामगिरी केली नाही. पण मला माहीत होतं की मी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे माझा माझ्यावर विश्वास होता. मी आयपीएलपूर्वी केलेल्या मेहनतीवर विश्वास ठेवला आणि या सामन्यांपूर्वी मी नेटमध्ये केलेल्या कामावर विश्वास ठेवला. मला वाटते की ते खूप चांगले वाटले.
दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू खेळाडू म्हणाला, “आम्ही अनेक गोष्टी कव्हर केल्या आहेत. आम्ही फक्त तुकडे एकत्र जोडणे आवश्यक आहे. रिकी पाँटिंग आणि कर्णधाराने जो संघ मैदानात उतरवला, तो संघ खरोखरच स्पर्धात्मक आहे असे मला वाटते.
हेही वाचा - Anton Rocks Fielding Coach : श्रीलंकेने अँटोन रॉक्सची क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती