ETV Bharat / sports

IPL 2022 DC vs SRH : सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात डेव्हिड वॉर्नरचा विक्रमांचा पाऊस...! - क्रिडाच्या बातम्या

गुरुवारी झालेल्या आयपीएल 2022 च्या 50 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने ( Delhi Capitals ) डेव्हिड वार्नरने नाबाद 92 धावांच्या जोरावर हैदराबादचा 21 धावांनी पराभव केला. त्याचबरोबर या खेळीच्या जोरावर डेव्हिड वार्नरने विक्रमांचा पाऊस पाडला होता.

David Warner
David Warner
author img

By

Published : May 6, 2022, 3:34 PM IST

मुंबई: आयपीएल 2022 मधील 50 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा 21 धावांनी पराभव केला. डेव्हिड वार्नरने ( David Warner ) नाबाद 92 धावांची खेळी केली. या खेळीद्वारे त्याने अनेक विक्रम तर केलेच, पण आपल्या जुन्या संघाकडून एक प्रकारचा बदलाही घेतला. डेव्हिड वॉर्नरने या खेळीने ख्रिस गेलचा मोठा विक्रम मोडला. डेव्हिड वॉर्नरने 58 चेंडूंचा सामना करत 12 चौकार आणि तीन षटकार ठोकले. तो पाचव्या शतकाच्या जवळ होता पण शेवटच्या षटकात त्याने आपल्या कारनाम्यांपेक्षा संघाच्या धावांना महत्त्व दिले.

डेव्हिड वॉर्नरने मोडला गेलचा विक्रम - डेव्हिड वॉर्नरने 92 धावांच्या खेळीद्वारे टी-20 क्रिकेटमधील 89 वे अर्धशतक झळकावले. यासह तो टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतक ( Most fifties in T20 cricket ) ठोकणारा फलंदाज ठरला. त्याने वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलचा विक्रम मोडला. टी-20 क्रिकेटमध्ये गेलने 88 अर्धशतके झळकावली होती आणि तो अव्वल स्थानावर होता. आता गेल दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली 76 अर्धशतकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

IPL 2022 मधील सर्वाधिक अर्धशतके - डेव्हिड वॉर्नरने आयपीएल 2022 मध्ये चौथे अर्धशतक झळकावले. यासह तो या मोसमात सर्वाधिक अर्धशतक ठोकणारा फलंदाज ठरला आहे. त्याने सूर्यकुमार यादव, एडन मारक्रम, शिखर धवन, हार्दिक पंड्या, लियाम लिव्हिंगस्टन, जोस बटलर आणि दीपक हुडा यांना मागे सोडले, ज्यांनी या हंगामात प्रत्येकी तीन अर्धशतके केली आहेत.

कोहली-एबीडीही राहिले मागे - यासोबतच डेव्हिड वॉर्नरने एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली ( AB de Villiers and Virat Kohli ) यांचाही मोठा विक्रम मोडीत काढला. आयपीएलमध्ये 200 पेक्षा जास्त स्कोअर असलेल्या सामन्यांमध्ये 50 पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. वॉर्नरने 11व्यांदा 200 प्लस स्कोअरसह 50 पेक्षा जास्त धावा केल्या. एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली यांनी 10-10 वेळा कामगिरी केली आहे. त्याचवेळी ख्रिस गेलने नऊ वेळा अशी कामगिरी केलीय.

हेही वाचा - DC Vs SRH 2022 : दिल्ली कॅपिटल्सकडून सनरायझर्स हैदराबादचा 21 धावांनी पराभव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.