चेन्नई - आयपीएल २०२१ मध्ये आज डबल हेडरमधील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात रंगला आहे. चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये रंगलेल्या या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
हैदराबादने आपल्या संघात एक बदल केला आहे. त्यांनी दुखापतग्रस्त भुवनेश्वर कुमारच्या जागेवर जे सुचित याला स्थान दिलं आहे. तर दुसरीकडे दिल्ली संघाने देखील आपल्या संघात एक बदल केला आहे. त्यांनी ललित यादवच्या जागेवर अष्टपैलू अक्षर पटेलला संघात संधी दिली आहे.
सनरायजर्स हैदराबाद वि. दिल्ली कॅपिटल्स हेड टू हेड आकडेवारी -
उभय संघातील हेड टू हेड आकडेवारी पहिल्यास हैदराबादचा पगडा भारी असल्याचे दिसून येते. हैदराबाद संघाने ११ सामन्यात विजय मिळवला आहे. तर दिल्लीने ७ सामने जिंकली आहेत.
सनरायजर्स हैदराबादचा संघ -
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, केन विल्यमसन, विजय शंकर, केदार जाधव, विराट सिंह, अभिषेक शर्मा, राशिद खान, जे सुचित, खलील अहमद आणि सिद्धार्थ कौल.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ -
ऋषभ पंत (कर्णधार), शिखर धवन, पृथ्वी शॉ, स्टिव्ह स्मिथ, शिमरोन हेटमायर, मार्कस स्टॉयनिस, अक्षर पटेल, आर.अश्विन, अमित मिश्रा, कगिसो रबाडा आणि आवेश खान.
हेही वाचा - लिहून घ्या, KKRचा 'हा' खेळाडू IPL संपेपर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूत असेल - डेव्हिड हसी
हेही वाचा - CSK VS RCB : जडेजाने बंगळुरूचा पद्धतशीर कार्यक्रम केला, चेन्नईचा ६९ धावांनी विजय