मुंबई - आयपीएल २०२१ मध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होत आहे. दिल्ली कॅपिटल्सने या हंगामाची सुरूवात विजयाने केली आहे. त्यांनी सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सहज पराभव केला. दुसरीकडे राजस्थानचा संघाला पंजाब किंग्जविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात अवघ्या चार धावांनी पराभूत व्हावं लागलं. आजचा सामना जिंकून गुणतालिकेत अव्वलस्थान काबीज करण्याचा मनसुबा दिल्ली संघाचा आहे. तर दुसरीकडे राजस्थानचा संघ विजयाचे खाते उघडण्याच्या प्रयत्नात आहे. दरम्यान, या सामन्याआधी आम्ही तुम्हाला उभय संघातील हेड टू हेड आकडेवारी आणि काही विशेष रेकॉर्ड्स याची माहिती देणार आहोत.
राजस्थान रॉयल्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स हेड टू हेड आकडेवारी आणि रेकॉर्ड्स
- आयपीएलमध्ये उभय संघात आतापर्यंत २२ सामने झाली आहेत. यात राजस्थान संघाने ११ सामन्यात विजय मिळवला आहे. तर राहिलेल्या ११ सामन्यात दिल्लीचा संघ विजयी ठरला आहे. हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास दोन्ही संघ तोडीस तोड असल्याचे दिसून येते.
- यूएईमध्ये खेळण्यात आलेल्या मागील हंगामात दिल्ली कॅपिटल्सने साखळी फेरीतील दोन्ही सामन्यात राजस्थानचा पराभव केला होता.
- राजस्थानकडून दिल्लीविरुद्ध सर्वाधिक धावा अजिंक्य रहाणेने (६०१)काढल्या आहेत. पण तो यावेळी दिल्लीकडून खेळत आहे.
- दिल्लीकडून राजस्थानविरुद्ध सर्वाधिक धावा ऋषभ पंतने केल्या आहेत. त्याने १८८.०३ च्या सरासरीने २२५ धावा काढल्या आहेत.
- राजस्थानकडून दिल्लीविरुद्ध सर्वाधिक विकेट वेगवान गोलंदाज जोफ्रा ऑर्चरने (७) टिपले आहेत.
- दिल्ली कॅपिटल्सकडून राजस्थानविरुद्ध सर्वाधिक विकेट अमित मिश्राने (२०) घेतल्या आहेत.
राजस्थान रॉयल्सचा संघ -
संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, मनन वोहरा, अनुज रावत, रियान पराग, डेविड मिलर, राहुल तेवतिया, महिपाल लोमरोर, श्रेयस गोपाल, मयंक मार्कंडेय, अँड्रयू टाई, जयदेव उनादकट, कार्तिक त्यागी, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, मुस्ताफिजुर रहमान, चेतन सकारिया, केसी करियप्पा, लियाम लिविंगस्टोन, कुलदीप यादव आणि आकाश सिंह.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ -
ऋषभ पंत (कर्णधार), शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, शिमरोन हेटमायर, मार्कस स्टॉयनिस, ख्रिस वोक्स, आर अश्विन, अमित मिश्रा, ललित यादव, प्रवीण दुबे, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्ट्जे, इशांत शर्मा, आवेश खान, स्टीव स्मिथ, उमेश यादव, रिपल पटेल, विष्णु विनोद, लुकमान मेरीवाला, एम सिद्दार्थ, टॉम करन आणि सॅम बिलिंग्स.
हेही वाचा - IPL २०२१ : अनन्या पांडेसोबत डेटवर जायचंयं 'या' राजस्थानच्या युवा खेळाडूला
हेही वाचा - कगिसो रबाडाचा क्वांरटाईन कालावधी पूर्ण; राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळण्यास सज्ज