ETV Bharat / sports

RCB VS PBKS : बंगळुरूचे पंजाबसमोर 165 धावांचे आव्हान; मॅक्सवेलची वादळी खेळी

आयपीएल 2021 मध्ये आज डबल हेडरमधील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यात रंगला आहे. बंगळुरूने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 164 धावा केल्या आहेत. पंजाबला विजयासाठी 165 धावांचे आव्हान मिळाले आहे.

IPL 2021 RCB VS PBKS : Royal Challengers Bangalore set target of 165 runs for  Punjab Kings
RCB VS PBKS : बंगळुरूचे पंजाबसमोर 165 धावांचे आव्हान; मॅक्सवेलची वादळी खेळी
author img

By

Published : Oct 3, 2021, 5:17 PM IST

Updated : Oct 3, 2021, 5:22 PM IST

शारजाह - ग्लेन मॅक्सवेल तुफानी अर्धशतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पंजाब किंग्ससमोर विजयासाठी 165 धावांचे आव्हान ठेवले आहे. बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत 20 षटकात 7 बाद 164 धावा केल्या आहेत. मॅक्सवेलने 33 चेंडूत 57 धावांची खेळी साकारली. यात 3 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. पंजाबकडून हेनरिक्स आणि शमीने प्रत्येकी 3-3 गडी बाद केले.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बंगळुरूची सलामीवीर जोडी विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल मैदानात आले. त्यांनी सावध खेळ केला. दोघांनी 9.4 षटकात 68 धावांची सलामी दिली. हेनरिक्सने बंगळुरूला एकपाठोपाठ तीन सलग धक्क दिले.

हेनरिक्सने 10व्या षटकातील चौथ्या चेंडूवर विराट कोहलीला क्लिन बोल्ड केले. विराटने 24 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकारांसह 25 धावा केल्या. यानंतर पुढील चेंडूवर हेनरिक्सने डॅनियल ख्रिश्चिनची शिकार केली. त्याचा झेल सर्फराज खानने घेतला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. 12व्या षटकात हेनरिक्सने देवदत्त पडीक्कल याला बाद केले. पडीक्कलने 38 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारासह 40 धावांचे योगदान दिले.

बिनबाद 68 वरून बंगळुरूची अवस्था 3 बाद 73 अशी झाली. तेव्हा फॉर्मात असलेल्या ग्लेन मॅक्सवेलने मोर्चा सांभाळला. त्याने पंजाबच्या फिरकी गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवला. त्याने बरार आणि बिश्नोई यांच्या गोलंदाजीवर गगनचुंबी षटकार मारले. त्याला डिव्हिलियर्सची साथ लाभली. दोघांनी चौथ्या गड्यासाठी अर्धशतकी भागिदारी केली.

हाणामारीच्या षटकात डिव्हिलियर्स धावबाद झाला. त्याने 1 चौकार आणि 2 षटकारांसह 23 धावांचे योगदान दिले. मॅक्सवेल अखेरच्या षटकात बाद झाला. त्याने 33 चेंडूत 57 धावांची खेळी साकारली. यात 3 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. शाहबाज अहमदने 8 धावांचे योगदान दिले. गार्टन शून्यावर परतला. तर श्रीकर भरत शून्यावर तर हर्षल पटेल 1 धावेवर नाबाद राहिला. अखेरीस बंगळुरूला 164 धावांपर्यंत मजल मारता आली. पंजाबकडून हेनरिक्स आणि शमीने प्रत्येकी 3-3 गडी बाद केले.

हेही वाचा - IPL 2021 : पंजाबचा कोलकातावर पाच गडी राखून विजय; शाहरूख खानची तडाखेबाज फलंदाजी

हेही वाचा - IND W vs AUS W: भारताचा पहिला डाव 241 धावांवर घोषित; भारताला 136 धावांची आघाडी

Last Updated : Oct 3, 2021, 5:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.