ETV Bharat / sports

IPL २०२१: सॅमसनचा सामना धोनीशी; पाहा कोणाचा पगडा भारी

author img

By

Published : Apr 19, 2021, 5:00 PM IST

Updated : Apr 19, 2021, 7:28 PM IST

आयपीएल २०२१ मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. उभय संघातील हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास यात चेन्नईचा संघ वरचढ असल्याचे दिसून येते.

ipl-2021-rajasthan-royals-vs-chennai-superkings-head-to-head-record-you-need-to-know
IPL २०२१: सॅमसनचा सामना धोनीशी, पाहा कोणाचा पगडा भारी

मुंबई - आयपीएल २०२१ मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. उभय संघातील हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास यात चेन्नईचा संघ वरचढ असल्याचे दिसून येते. दोन्ही संघ आतापर्यंत २३ वेळा आमने-सामने आले आहेत. यात चेन्नईने १४ सामन्यात विजय मिळवला आहे. तर राजस्थानचा संघ ९ सामन्यात विजयी ठरला आहे.

वर्ष २०१५ नंतर दोन्ही संघानी प्रत्येकी ४-४ सामने जिंकली आहे. मागील पाच सामन्याचा विचार केला तर राजस्थानने तीन तर चेन्नईने दोन सामने जिंकली आहेत. कोरोनामुळे आयपीएलचा मागील हंगामाचे आयोजन युएईमध्ये करण्यात आले होते. या हंगामात उभय संघात झालेल्या दोन्ही सामन्यात राजस्थान संघाने बाजी मारली होती. चेन्नईचे मागील हंगामातील प्रदर्शन निराशजनक होते.

आयपीएल २०२० च्या पहिल्या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद २०१६ धावांचा डोंगर उभारला होता. यात संजू सॅम सॅमसनने ३२ चेंडूत ७४ धावांची खेळी केली होती. प्रत्युत्तरादाखल चेन्नईचा संघाला २०० धावांपर्यंत मजल मारता आली. दुसऱ्या सामन्यात चेन्नईचा संघ २० षटकात ५ बाद १२५ धावाच करू शकला. हा सामना राजस्थानने १७.३ षटकात ७ गडी राखून जिंकला होता. या सामन्यात बटलर-स्मिथने ९८ धावांची भागिदारी केली होती. यात बटलरने यात ४८ चेंडूत ७८ धावा केल्या.

हेही वाचा - IPL २०२१ : 'वाढदिवसाच्या दिवशी विजय मिळवू इच्छित होतो..', राहुलने सांगितलं पराभवाचं कारण

हेही वाचा - IPL २०२१ : आतापर्यंत पाहिलेलं हे सर्वात विचित्र नेतृत्व, गंभीरने मॉर्गनला फटकारलं

Last Updated : Apr 19, 2021, 7:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.