मुंबई - आयपीएलच्या इतिहासात एक अजब योगायोग पाहायला मिळाला. सलग तीन सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेगवेगळ्या संघांनी समान धावा केल्या. वाचा नेमकं काय आहे हा प्रकार...
आज आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील २४वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात पार पडला. या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ बाद १७१ धावा करत मुंबईला विजयासाठी १७२ धावांचे आव्हान दिले. मुंबईने हा सामना ७ गडी राखून जिंकला.
बुधवारी (ता. २८) आयपीएल २०२१ मध्ये २३वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात रंगला होता. या सामन्यात हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ३ बाद १७१ धावा करत चेन्नईसमोर विजयासाठी १७२ धावांचे आव्हान ठेवले होते. चेन्नईने हा सामना ७ गडी राखून जिंकला.
मंगळवारी (ता. २७) आयपीएलमध्ये २२वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पार पडला. या सामन्यात बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ बाद १७१ धावा केल्या. दिल्लीने हा सामना एका धावेने गमावला.
सलग ३ सामन्यात पहिले फलंदाजी करणाऱ्या संघाने सारख्याच धावा केल्याची घटना आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच घटली आहे. विशेष म्हणजे या तीन सामन्यात दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या दोन संघाला विजय मिळवता आला आहे. तर एक सामना प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकला.
हेही वाचा - MI VS RR : मुंबईने राजस्थानचा ७ गडी राखून उडवला धुव्वा, डी कॉकची धमाकेदार खेळी
हेही वाचा - बेन स्टोक्सच्या जागेवर राजस्थान संघाने घेतला नवा खेळाडू, वाचा कोण आहे तो