चेन्नई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील नववा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात शनिवारी पार पडला. या सामन्यात मुंबईने १३ धावांनी विजय मिळवला. या विजयासह मुंबईने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला धक्का देत गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे.
सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्याआधी मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी होता. बंगळुरू संघ पहिल्या तर चेन्नईचा संघ दुसऱ्या स्थानावर होता. शनिवारी मुंबईने हैदराबादवर विजय मिळवला. मुंबई इंडियन्सचे ३ सामन्यात दोन विजय आणि एका पराभवासह ४ गुण झाले आहेत. गुणतालिकेत बंगळुरूचे देखील चार गुण आहेत. त्यांनी दोन पैकी दोन सामन्यात विजय मिळवला आहे. पण मुंबईचा संघ नेट रनरेटच्या जोरावर पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
तिसऱ्या स्थानावर चेन्नईचा संघ आहे. त्यांनी दोन पैकी एक विजय एक पराभवासह दोन गुण मिळवले आहेत. दिल्ली कॅपिटल्स चौथ्या, राजस्थान रॉयल्स पाचव्या, कोलकाता नाइट रायडर्स सहाव्या, पंजाब किंग्ज सातव्या क्रमांकावर आहेत. या संघानी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. परंतु ते नेट रनरेटच्या आधारावर गुणतालिकेत विविध स्थानावर आहेत. सलग तीन पराभवासह हैदराबादचा संघ गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर आहे.
हेही वाचा - कोरोनावर मात करून बंगळुरू संघात सामिल झाला 'हा' स्टार खेळाडू
हेही वाचा - IPL २०२१ : मुंबई इंडियन्सपुढे सनरायझर्स हैदराबाद मावळला; १३ धावांनी पराभव