मुंबई - आयपीएल २०२१ मध्ये रविवारी डबल हेडरमध्ये दोन सामने पार पडले. दुपारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा ३८ धावांनी पराभव केला. सायंकाळी दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जचा ६ गडी राखून धुव्वा उडवला. या दोन सामन्यानंतर गुणतालिकेत मोठे बदल झाले.
बंगळुरू संघाने कोलकाताचा पराभव करत अव्वल स्थान काबीज केले. त्यानंतर दिल्लीने पंजाबचा पराभव करत मुंबई संघाला धक्का दिला. पंजाबविरुद्धच्या सामन्याआधी दिल्लीचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी होता. तर मुंबई दुसऱ्या स्थानी होती. दिल्लीने पंजाबवर विजय मिळवत दुसरे स्थान पटकावले.
दिल्लीचे आतापर्यंत तीन सामन्यामध्ये दोन विजय आणि एका पराभवासह ४ गुण आहेत. मुंबईचे देखील तीन सामन्यात दोन विजय आणि एक पराभवासह चार गुण आहेत. पण दिल्लीचा संघ सरस नेट रनरेटच्या आधारावर दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. मुंबईचा संघ तिसऱ्या स्थानी घसरला आहे.
अशी आहे गुणतालिकेची स्थिती -
बंगळुरूचा संघ तीन सामन्यातील तीन विजयासह पहिल्या स्थानी आहे. दुसऱ्या स्थानी दिल्ली तर तिसऱ्या स्थानी मुंबईचा संघ आहे. चौथ्या, पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्थानावर अनुक्रमे चेन्नई, राजस्थान, कोलकाता आणि पंजाबचा संघ आहे. हे सर्व संघ नेट रनरेटच्या आधारावर विविध स्थानावर आहेत. सनरायजर्स हैदराबादचा संघ तीन पराभवासह अखेरच्या आठव्या स्थानी आहे.
हेही वाचा - 'हा' खेळाडू मुंबईकडे आहे तोपर्यंत मुंबई अजय राहील - विरेंद्र सेहवाग
हेही वाचा - RCB VS KKR : बंगळुरूची विजयाची हॅट्ट्रिक, केकेआरचा ३८ धावांनी पराभव