ETV Bharat / sports

IPL २०२१ Points Table: चेन्नई गुणतालिकेत अव्वल; जाणून घ्या इतर संघाची स्थिती

author img

By

Published : Apr 22, 2021, 4:06 PM IST

कोलकात्याविरुद्धच्या सामन्याआधी चेन्नईचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर होता. तर पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर अनुक्रमे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्सचा संघ होता. चेन्नईने कोलकात्याचा पराभव करत अव्वलस्थान काबीज केले.

IPL 2021 points table, after CSKs win over KKR
IPL २०२१ Points Table: चेन्नई गुणतालिकेत अव्वल; जाणून घ्या इतर संघाची स्थिती

मुंबई - आयपीएलच्या चौदाव्या पर्वामध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सलामीचा सामना गमावल्यानंतर सलग तीन सामन्यात विजय मिळवला. बुधवारी चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सचा १८ धावांनी पराभव करत सरस नेट रनरेटच्या जोरावर गुणतालिकेत अव्वलस्थान काबीज केले.

कोलकात्याविरुद्धच्या सामन्याआधी चेन्नईचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर होता. तर पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर अनुक्रमे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्सचा संघ होता. चेन्नईने कोलकात्याचा पराभव करत अव्वलस्थान काबीज केले. चेन्नई आणि बंगळुरूचे समान ६ गुण आहेत. परंतु बंगळुरूपेक्षा चेन्नईचा नेट रनरेट चांगला आहे. याचा फायदा त्यांना प्ले ऑफच्या क्रमांकासाठी होऊ शकतो. दिल्लीचा संघ तिसऱ्या स्थानी घसरला आहे.

गत विजेता मुंबई इंडियन्सचा संघ चौथ्या स्थानावर आहे. या हंगामात बंगळुरू आणि राजस्थान वगळता अन्य सर्व संघांनी चार सामने खेळले आहेत. आज बंगळुरू आणि राजस्थान यांच्यात सामना होणार आहे. हा सामना जिंकल्यास बंगळुरू संघाला पुन्हा अव्वल स्थान मिळेल.

सनरायजर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज या संघानी प्रत्येकी १-१ विजय मिळवला आहे. परंतु नेट रनरेटच्या जोरावर ते अनुक्रमे पाचव्या, सहाव्या, सातव्या आणि आठव्या क्रमाकांवर आहेत. यातील राजस्थान वगळता अन्य संघांनी प्रत्येकी ४-४ सामने खेळली आहेत.

हेही वाचा - IPL २०२१ : धोनी, रोहितनंतर मॉर्गनकडून झाली चूक, बसला १२ लाख रुपयांचा फटका

हेही वाचा - IPL २०२१ : वाईड जाईल म्हणून चेंडू सोडला अन् केकेआरने सामना गमावला, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.