दुबई - आयपीएल 2021 मध्ये आज डबल हेडरमधील दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. दोन्ही संघाना आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्रात विजयाचे खाते उघडता आलेले नाही. यामुळे दोन्ही संघ विजयी लय मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
आरसीबी 9 सामन्यात 10 गुणांची कमाई करत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. तर मुंबईने 9 पैकी 4 सामन्यात विजय मिळवले आहेत. राहिलेल्या 5 सामन्यात त्यांना पराभवांचे तोंड पहावे लागले आहे. ते गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहेत.
आरसीबी आणि मुंबई इंडियन्स संघाचे प्रयत्न आजचा सामना जिंकून प्ले ऑफच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकण्याचे असतील. आरसीबी आणि मुंबई इंडियन्स आजच्या सामन्यासाठी आपपल्या संघात मोठे बदल करण्याची शक्यता आहे.
मुंबई इंडियन्स संघात हार्दिक पांड्याची वापसी होऊ शकते. हार्दिकला सौरभ तिवारीच्या जागेवर अंतिम संघात स्थान मिळू शकते. तर दुसरीकडे आरसीबी शाहबाद अहमदला संधी देऊ शकते. मागील सामन्यात नवदीप सैनीला संधी मिळाली होती. पण त्याला आपली छाप सोडता आली नाही. यामुळे शाहबाज अहमदला संधी मिळू शकते. श्रीलंकेचा वानिंदु हसरंगा देखील चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संभाव्य संघ -
विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, ग्लेन मॅक्सवेल, ए बी डिव्हिलियर्स, टिम डेविड, एस भरत, वानिंदु हसरंगा, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, शाहबाज अहमद आणि हर्षल पटेल.
मुंबई इंडियन्सचा संभाव्य संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, केरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, ट्रेंट बोल्ट आणि राहुल चाहर.
हेही वाचा - SRH vs PBKS : पंजाबचे हैदराबादसमोर विजयासाठी 126 धावांचे आव्हान
हेही वाचा - IPL 2021 : पंजाब किंग्सने केवळ पाच धावांनी केला सनरायझर्स हैदराबादचा पराभव