अबुधाबी - गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाला आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्रात चांगली सुरूवात करता आली नाही. त्यांना चेन्नई सुपर किंग्स संघाकडून पराभव पत्कारावा लागला. आज मुंबई इंडियन्ससमोर कोलकाता नाइट रायडर्स संघाचे आव्हान आहे. या सामन्यात विजय मिळवून मुंबईचा संघ विजयी मार्गावर येण्यासाठी प्रयत्नशील आहे. दुसरीकडे केकेआरच्या संघाने दुसऱ्या सत्रातील पहिल्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा पराभव केला होता. यामुळे त्यांचे मनोबल वाढले आहे.
पाच वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्स गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. मुंबईने 8 सामने खेळली असून यात त्यांनी 4 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे कोलकाता नाइट रायडर्सच्या संघाने 8 सामन्यात 3 विजय मिळवले आहेत. ते गुणतालिकेत 6 व्या स्थानी आहेत.
मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाइट रायडर्स हेड टू हेड रेकॉर्ड -
उभय संघ आतापर्यंत आयपीएलमध्ये 28 वेळा आमने-सामने झाले आहेत. यातील 22 सामन्यात मुंबई इंडियन्सने विजय मिळवला आहे. तर कोलकाता नाइट रायडर्स संघाला फक्त 6 सामने जिंकता आली आहे. मागील सहा हंगामात केकेआरला फक्त एका सामन्यात मुंबईवर विजय मिळवता आला आहे. मागील 12 पैकी 11 सामने मुंबईने जिंकली आहेत. ही आकडेवारी पाहता मुंबईचे पारडे जड आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ -
रोहित शर्मा (कर्णधार) क्विंटन डी कॉक, इशान किशन, सूर्यकुमार यादव, आदित्य तारे, अनमोलप्रीत सिंह, ख्रिस लीन, सौरभ तिवारी, अनुकुल राय, अर्जुन तेंदुलकर, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, जेम्स नीशाम, जयंत यादव, केरॉन पोलार्ड, मार्को जानसेन, युद्धवीर सिंह, एडम मिल्ने, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, मोहसिन खान, नाथन कूल्टर-नाइल, पीयूष चावला, राहुल चाहर आणि ट्रेंट बोल्ट.
कोलकाता नाइट रायडर्सचा संघ -
इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, गुरकीरत सिंह मान, करुण नायर, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, शुबमन गिल, हरभजन सिंह, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्यूसन, पवन नेगी, प्रसिद्ध कृष्णा, संदीप वारियर, शिवम दुबे, टिम साउथी, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, बेन कटिंग, शाकिब अल हसन, सुनील नरेन, वेंकटेश अय्यर, शेल्डन जैक्सन आणि टिम सेफर्ट.
हेही वाचा - IPL 2021 : हैदराबादवर आठ गडी राखत दिल्लीचा विजय, गुणतालिकेत दिल्ली अव्वल स्थानी
हेही वाचा - DC VS SRH : दिल्ली कॅपिटल्सला जबर धक्का; अष्टपैलू खेळाडूला दुखापत