दुबई - आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्रात रविवारी दोन सामने पार पडले. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने अत्यंत अटातटीच्या लढतीत कोलकाता नाइट रायडर्सचा अखेरच्या चेंडूवर पराभव केला. चेन्नईने हा सामना 2 गडी राखून जिंकला. यात दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने मुंबई इंडियन्सचा 54 धावांनी पराभव केला.
आयपीएल 2021 मध्ये रविवारी झालेल्या सामन्यानंतर गुणातालिकेत मोठे बदल पाहायला मिळाले. आरसीबीचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर कायम आहे. तर रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणारा मुंबईचा संघ सातव्या स्थानी घसरला आहे.
मुंबई इंडियन्स, केकेआर, पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या संघाचे समान प्रत्येकी 8-8 गुण आहेत. पण नेट रनरेटमुळे मुंबई इंडियन्सचा संघ सातव्या स्थानी घसरला आहे. केकेआर चौथ्या, पंजाब पाचव्या आणि राजस्थान सहाव्या स्थानावर आहे.
-
A look at the Points Table after Match 39 of #VIVOIPL pic.twitter.com/GN8wYwIwMh
— IndianPremierLeague (@IPL) September 26, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">A look at the Points Table after Match 39 of #VIVOIPL pic.twitter.com/GN8wYwIwMh
— IndianPremierLeague (@IPL) September 26, 2021A look at the Points Table after Match 39 of #VIVOIPL pic.twitter.com/GN8wYwIwMh
— IndianPremierLeague (@IPL) September 26, 2021
चेन्नईने केकेआरचा पराभव करत गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वलस्थान पटकावले आहे. तर दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या स्थानी सरकला आहे. या दोन्ही संघानी 10 पैकी 8-8 सामने जिंकली आहेत. ते प्ले ऑफ फेरीसाठी पात्र ठरले आहेत.
हेही वाचा - IPL 2021 : केकेआर खरेचं कौतुकास पात्र आहे - महेंद्रसिंग धोनी
हेही वाचा - IPL 2021 : हर्षल पटेलने हॅट्ट्रिक घेतलेले षटक, विराट ख्रिश्चियनला फेकण्यास देणार होता