दुबई - आयपीएल 2021 चा 49वा सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जात आहे. हैदराबादचा संघ प्ले ऑफ फेरीतून बाद झाला आहे. तर कोलकाताचे आव्हान अद्याप बाकी आहे. त्यांना प्ले ऑफ फेरी गाठायची असल्यास राहिलेले दोन्ही सामने जिंकावी लागणार आहेत. हैदराबादने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोलकाताचा संघ सद्याच्या घडीला गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. कोलकाताने 12 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. त्याच्या खात्यात 10 गुण आहेत. तर दुसरीकडे हैदराबादचा संघ तळाशी आहे. त्यांना 11 पैकी फक्त 2 सामन्यात विजय मिळवला आला आहे.
उमरान मलिकचा डेब्यू, केकेआरमध्ये एक बदल
कोलकाताने आपल्या संघात एक बदल केला आहे. त्यांनी टिम सेफर्टच्या जागेवर अष्टपैलू शाकिब अल हसनला अंतिम संघात स्थान दिले आहे. दुसऱ्या सत्रात शाकिबचा हा पहिलाच सामना आहे. दुसरीकडे हैदराबादने जम्मू-काश्मिरचा क्रिकेटर उमरान मलिकला संधी दिली आहे. मलिकचा हा डेब्यू सामना आहे.
हैदराबाद वि. कोलकाता कोणाचा पगडा भारी?
आकडेवारी पहिल्यास कोलकाताचा पगडा भारी आहे. दोन्ही संघात आत्तापर्यंत 20 सामने झाली आहेत. यात 13 सामन्यात कोलकाताने विजय मिळवला आहे. तर 7 सामने हैदराबादने जिंकली आहेत.
सनरायझर्स हैदराबाद प्लेईंग इलेव्हन -
जेसन रॉय, वृद्धिमान साहा, केन विल्यमसन (कर्णधार), प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, जेसन होल्डर, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक आणि सिद्धार्थ कौल.
कोलकाता नाइट रायडर्स प्लेईंग इलेव्हन -
शुबमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, इयॉन मॉर्गन (कर्णधार), शाकिब अल हसन, दिनेश कार्तिक, सुनील नरेन, शिवम मावी, टिम साउथी आणि वरुण चक्रवर्ती.
हेही वाचा - IPL 2021 : गायकवाडच्या शतकी खेळीनंतर प्रशिक्षक फ्लेमिंगची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
हेही वाचा - RCB VS PBKS : बंगळुरूचे पंजाबसमोर 165 धावांचे आव्हान; मॅक्सवेलची वादळी खेळी