मुंबई - दिल्ली कॅपिटल्स संघाचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला आहे. बुधवारी त्याने संघासोबत सराव केला. दिल्ली संघाने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊटवरून रबाडा सराव करतानाचे फोटो शेअर केले आहेत. आज दिल्लीचा सामना राजस्थान रॉयल्सविरूद्ध होत आहे. या सामन्यात रबाडा खेळू शकतो.
दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जला नमवून यंदाच्या आयपीएलमध्ये दिमाखात सुरुवात केली. पण पहिल्या विजयानंतर त्यांना मोठा धक्का बसला. त्यांचा प्रमुख वेगवान गोलंदाज एनिरिक नार्टिजे कोरोना पॉझिटिव्ह आढळला. यामुळे तो पुढील काही सामने खेळू शकणार नव्हता. त्यामुळे दिल्ली पुढील अडचणी वाढल्या होत्या. अशात त्यांचा दुसरा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला आहे. त्याने संघाच्या सराव सत्रात भाग घेतला. रबाडा संघात खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
कगिसो रबाडा दिल्ली कॅपिटल्सच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये टॉम कुरेनला रिप्लेस करू शकतो. दरम्यान, रबाडाने युएईमध्ये खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या मागील हंगामात सर्वाधिक विकेट घेत पर्पल कॅप पुरस्कार जिंकला होता. त्याने ८.३४ च्या इकॉनामीने ३० गडी बाद केले होते. दिल्लीला अंतिम फेरीत घेऊन जाण्यात रबाडाचा सिंहाचा वाटा राहिला होता.
हेही वाचा - IPL २०२१ : दोन युवा कर्णधारामध्ये आज लढत; दिल्ली-राजस्थान आमने-सामने
हेही वाचा - IPL Points Table : हैदराबादच्या पराभवानंतर गुणतालिकेत मोठा बदल