ETV Bharat / sports

IPL 2021 : आयपीएलचा दुसरा टप्पा युएईमध्ये रंगणार 19 सप्टेंबरपासून.. 'या' दोन दिग्गज संघात सलामीची लढत - indian premier league 2021

आयपीएलचा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. वृत्तसंस्था एएनआयनुसार पहिल्याच दिवशी म्हणजेच १९ तारखेला पाच वेळचा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्स आणि तीन वेळा विजेतेपद पटकावलेला चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात टक्कर होणार आहे.

indian premier league
indian premier league
author img

By

Published : Jul 25, 2021, 8:06 PM IST

मुंबई - इंडियन प्रीमिअर लीगच्या 14 व्या पर्वातील उर्वरित सामने संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात येणार आहेत. 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत पार पडण्यात येणाऱ्या 31 सामन्यांचे वेळापत्रक बीसीसीआयकडून आज जाहीर करण्यात आले. गतविजेता मुंबई इंडियन्स आणि माजी विजेता चेन्नई सुपर किंग्स यांच्यात 19 सप्टेंबरला सामना रंगणार आहे. हा सामना दुबईत खेळवण्यात येणार आहे.

कोरोना महामारीमुळे आयपीएल 2021 स्पर्धा अर्ध्यातच थांबवावी लागली होती. स्पर्धेदरम्यान काही खेळाडू व सपोर्ट स्टाफचे सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. आयपीएल 2021 च्या बायो-बबलमध्ये कोरोनाचा प्रसार झाल्याचे समोर आल्यानंतर 4 मे रोजी ही स्पर्धा स्थगित केली होती. त्यावेळी 29 सामने खेळले गेले होते.

आयपीएल 2021 सत्राची सुरुवात 9 एप्रिल रोजी चेन्नई येथे झाली होती. आयपीएलच्या 14 व्या सत्राचा अंतिम सामना अहमदाबाद येथे खेळवला जाणार होता. आयपीएल 2021 मध्ये रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने 8 पैकी 6 सामने जिंकून 12 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. चेन्नई सुपर किंग्स 7 पैकी 5 सामने जिंकून दुसऱ्या क्रमांकावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू ( 10 गुण), मुंबई इंडियन्स ( 8), राजस्थान रॉयल्स ( 6), पंजाब किंग्स ( 6), कोलकाता नाइट रायडर्स ( 4) व सनरायझर्स हैदराबाद ( 2) हे गुणतालिकेत एकापाठोपाठ आहेत.

आता राहिलेले 31 सामने यूएईमध्ये आयोजित केले जाणार आहे. त्याअंतर्गत दुबई, शारजाह आणि अबूधाबीमध्ये सामने खेळवले जातील. आयपीएल 2021 चा अंतिम सामना 15 ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल. फायनल दुबईत खेळवले जाईल. 10 ऑक्टोबरला पहिला क्वालिफायर सामना दुबईत तर एलिमिनेटर आणि दूसरा क्वालिफायर सामना शारजाहमध्ये 11 आणि 13 ऑक्टोबरला खेळवला जाईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.