ETV Bharat / sports

'BCCIने तात्काळ IPL स्पर्धा थांबवली पाहिजे, खेळाडू आता सुरक्षित नाहीत' - आयपीएल २०२१

पहिले जेव्हा मला कोणी विचारलं तर मी म्हणायचो की, सर्व जण बायो बबलमध्ये सुरक्षित आहे. देशातील जनता कंटाळलेली आहे. आयपीएलच्या माध्यमातून त्यांचं मनोरंजन होत आहे. या सर्व कारणाने मी ही स्पर्धा व्हावी असे म्हणत होतो. परंतु, आता बायो बबलमध्ये असताना देखील खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे ही स्पर्धा थांबवली पाहिजे, असेही आझाद यांनी सांगितलं.

IPL 2021: ‘BCCI should immediately stop IPL, players are not safe anymore,’ Kirti Azad bats for IPL postponement
'BCCIने तात्काळ IPL स्पर्धा थांबवली पाहिजे, खेळाडू आता सुरक्षित नाहीत'
author img

By

Published : May 3, 2021, 9:47 PM IST

Updated : May 3, 2021, 10:46 PM IST

मुंबई - आयपीएलमधील संघ कोलकाता नाईट रायडर्सचे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यामुळे आज होणारा कोलकाता विरूद्ध बंगळुरू हा सामना स्थगित करण्यात आला. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या स्टाफमधील तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर डीडीसीएच्या ग्राउंड स्टाफमधील पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिलं आहे. या विषयावरून भारताचे माजी खेळाडू किर्ती आझाद यांनी रोखठोक मत मांडलं आहे.

किर्ती आझाद यांनी एका क्रीडा संकेत स्थळाला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये बोलताना आझाद म्हणाले की, मला वाटत होतं की, खेळाडू बायो बबलमध्ये सुरक्षित राहून क्रिकेट प्रेमी आणि देशवासियांचे मनोरंजन करत आहेत. पण दुर्दैवाची गौष्ट अशी आहे की, बायो बबलमध्ये राहून देखील खेळाडूंसह स्टाफमधील लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. सरळ बाब आहे की, सुरक्षेची यात कमी आहे. जर आणखी काही जणांना लागण झाल्यास ही स्पर्धा थांबवली पाहिजे.'

सहा दिवसापर्यंत कोरोनाची लक्षणे दिसून येत नाहीत. सातव्या दिवशी तुम्हाला याबद्दल माहिती मिळते. केकेआर आणि सीएसकेच्या स्टाफसोबत जे झालं, यात सुरक्षेची कमी होती. ज्याला आपण सुरक्षित झोन समजत होते. पहिली गोष्ट सुरक्षेची कमी आहे. दुसरी कोरोना अदृश्य स्वरुपात असल्याने तो खूप धोकादायक आहे. तिसरा हा व्हायरस जीवघेणा आहे. यामुळे ही स्पर्धा थांबवली पाहिजे, असे देखील आझाद म्हणाले.

पहिले जेव्हा मला कोणी विचारलं तर मी म्हणायचो की, सर्व खेळाडू बायो बबलमध्ये सुरक्षित आहे. देशातील जनता कंटाळलेली आहे. आयपीएलच्या माध्यमातून त्यांचं मनोरंजन होत आहे. या सर्व कारणाने मी ही स्पर्धा व्हावी असे म्हणत होतो. परंतु, आता बायो बबलमध्ये असताना देखील खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे ही स्पर्धा थांबवली पाहिजे, असेही आझाद यांनी सांगितलं.

हेही वाचा - कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाची भारताला मदत

हेही वाचा - 'तुमचे हात रक्ताने माखलेले', ऑस्ट्रेलियन समालोचकाची आपल्याच पंतप्रधानांवर सडकून टीका

Last Updated : May 3, 2021, 10:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.