मुंबई - ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आणि आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत असलेला अँड्र्यू टायने वैयक्तिक कारण देत आयपीएल स्पर्धेतून माघार घेत मायदेशी परतला आहे. पण त्याने जाताना, भारतात इतकी मोठी आरोग्य समस्या आहे. हॉस्पिटलमध्ये रुग्णाला बेड मिळत नाही आणि रोज हजारो लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागत आहे. असे असताना आयपीएलमध्ये फ्रेंचायझी कंपन्या आणि सरकार पाण्यासारखा पैसा खर्च कसे करते आहेत याचे नवल वाटते, असे म्हटलं आहे.
टाय पुढे म्हणाला,'आयपीएलमुळे कोरोना पीडितांचा तणाव कमी होत असेल, त्यांना रोगाशी लढण्यासाठी उमेद मिळत असेल तरी ही स्पर्धा सुरु ठेवली पाहिजे. पण भारतीय दृष्टीकोनातून विचार केला तर देशाच्या संकट काळात फ्रेंचायझी कंपन्या इतका अमाप खर्च कशा काय करू शकतात?'
प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असेल. त्यामुळे मला दुसऱ्याच्या विचाराचा मान ठेवणे आवडेल. आयपीएल मध्ये खेळाडू सुरक्षित आहेत, पण कधी पर्यंत असा सवालही त्याने उपस्थित केला आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्स संघाने टायला १ कोटी रुपयात खरेदी केले आहे. पण त्याला या स्पर्धेत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. टायने याच महिन्यात लग्न केलं आहे. तो आपल्या कुटुंबियासह सुरक्षित घरी राहू इच्छित आहे.
हेही वाचा - सलग ४ पराभवानंतर केकेआरला विजय; ५ गडी राखून पंजाबवर मात
हेही वाचा - कोरोनाच्या भीतीने खेळाडू IPL मधून माघार घेत आहेत, BCCI म्हणते...