ETV Bharat / sports

IPL 2021 : धोक्याची घंटा! ए बी डिव्हिलियर्सचे आयपीएल स्पर्धेला सुरूवात होण्याआधीच वादळी शतक - आयपीएल 2021

आरसीबीने इंट्रा स्क्वाड सराव सामन्याचे आयोजन केले होते. यात आरसीबी ए आणि आरसीबी बी असे दोन संघ तयार करण्यात आले होते. ए बी डिव्हिलियर्सने या सामन्यात आरसीबी ए संघाकडून खेळताना 104 धावांची वादळी खेळी केली.

IPL 2021 : ab de villiers-scored-a-century-in-the-first-practice-match-of-rcb
IPL 2021 : धोक्याची घंटा! ए बी डिव्हिलियर्सचे आयपीएल स्पर्धेत सुरूवात होण्याआधीच तुफानी शतक
author img

By

Published : Sep 15, 2021, 8:16 PM IST

दुबई - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा विस्फोटक फलंदाज ए बी डिव्हिलियर्सने इंट्रा स्क्वाड सराव सामन्यात शतक झळकावत विरोधी संघाना इशारा दिला आहे. आरसीबीने इंट्रा स्क्वाड सराव सामन्याचे आयोजन केले होते. यात आरसीबी ए आणि आरसीबी बी असे दोन संघ तयार करण्यात आले होते. आरसीबी ए संघाचा कर्णधार हर्षल पटेल तर आरसीबी बीचे नेतृत्व देवदत्त पडीक्कलकडे होते.

आरसीबी ए संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ए संघाने, ए बी डिव्हिलियर्सच्या शतकी खेळीच्या जोरावर 212 धावा केल्या. यात ए बी डिव्हिलियर्सने 46 चेंडूत 7 चौकार आणि 10 षटकारांसह 104 धावांची खेळी केली. त्याला अजहरूद्दीने याने 43 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारासह 66 धावांची खेळी करत चांगली साथ दिली. प्रत्युत्तरादाखल आरसीबी बी संघाने के एस भरतच्या 95 आणि पडीक्कलच्या 36 धावांच्या खेळीच्या जोरावर सामन्यात 7 गडी राखून विजय मिळवला.

ए बी डिव्हिलियर्स म्हणाला की, जेव्हा आम्ही येथे आलो आणि बसमधून खालो उतरलो तेव्हा मी विचार करत होतो की, दिवसा टी-20 क्रिकेट खेळणे थोडेसे विचित्र आहे. मी क्रीजवर आपल्या सहकारी फलंदाजाला म्हणलो, खेळपट्टी चांगली आणि सपाट आहे. आपण यावर हवं तसे खेळू शकतो. आम्ही जितक्या धावा केल्या. यावर मी समाधानी आहे. तसेच धावा करून मी खूश आहे.

आरसीबीचे प्रशिक्षक माइक हेसन यांनी सांगितलं की, खूप चांगला सामना झाला. अनेक खेळाडूंची यात चांगली कामगिरी केली. दोन्ही संघाच्या वरच्या फलंदाजांनी चांगली खेळी केली. विशेष बाब म्हणजे, अखेरपर्यंत त्यांच्यावर दबाव होता. हीच बाब मी पाहू इच्छित होतो.

आरसीबी आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्रात आपल्या अभियानाला कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. उभय संघातील हा सामना 20 सप्टेंबर रोजी अबुधाबीत खेळला जाणार आहे.

हेही वाचा - '2017 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलसारखी कामगिरी करून टी-२० विश्वकरंडकमध्ये भारताला नमवू'

हेही वाचा - ICC T20 Rankings: विराट कोहलीला एका स्थानाचा फायदा, क्विंटन डी कॉकची मोठी झेप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.