ETV Bharat / sports

काय सांगता..? विराटला बाद करण्यासाठी 'या' गोलंदाजाला लागली ११ वर्षे!

author img

By

Published : Nov 3, 2020, 3:27 PM IST

दिल्लीचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने आयपीएलच्या इतिहासात प्रथमच विराटला बाद केले. अश्विन २००९पासून या स्पर्धेत खेळत आहे, पण आजपर्यंत त्याने विराटला बाद केले नव्हते. आयपीएलमध्ये प्रथमच कोहलीची विकेट घेण्यासाठी अश्विनला १९ डाव आणि १२५ चेंडूंचा सामना करावा लागला. या सामन्यात बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने २४ चेंडूंत २९ धावा केल्या.

ravichandran ashwin dismisses virat kohli for the first time in ipl history
काय सांगता..? विराटला बाद करण्यासाठी 'या' गोलंदाजाला लागली ११ वर्षे!

नवी दिल्ली - आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अबुधाबी येथे हंगामाचा ५५वा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात दिल्लीने बंगळुरूवर सहा विकेट्सने विजय मिळवत प्लेऑफसाठी प्रवेश केला. तर रनरेटच्या जोरावर बंगळुरूनेही प्लेऑफसाठी तिसरे स्थान पटकावले. या सामन्यात दिल्लीच्या गोलंदाजाने आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा विराट कोहलीला बाद करत विक्रम रचला.

दिल्लीचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने आयपीएलच्या इतिहासात प्रथमच विराटला बाद केले. अश्विन २००९पासून या स्पर्धेत खेळत आहे, पण आजपर्यंत त्याने विराटला बाद केले नव्हते. आयपीएलमध्ये प्रथमच कोहलीची विकेट घेण्यासाठी अश्विनला १९ डाव आणि १२५ चेंडूंचा सामना करावा लागला. या सामन्यात बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने २४ चेंडूंत २९ धावा केल्या.

ravichandran ashwin dismisses virat kohli for the first time in ipl history
दिल्लीचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन

सलामीवीर शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे आव्हान सहज पेलले. या विजयामुळे दिल्ली प्लेऑफसाठी पात्र होणारा दुसरा संघ ठरला आहे. त्यामुळे क्वालिफायर-१च्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये सामना रंगणार आहे. तर, बंगळुरूच्या संघाचा पराभव झाला असला, तरी रनरेटच्या जोरावर ते प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत.

दिल्लीसाठी १५३ धावांचे आव्हान -

शेख झायेद मैदानावर बंगळुरूने दिल्लीला विजयासाठी १५३ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने पृथ्वी शॉला स्वस्तात गमावले. मात्र, अजिंक्य रहाणे आणि शिखर धवनने भागिदारी रचत दिल्लीला विजयाजवळ पोहोचवले. धवनने ६ चौकारांसह ५४ तर, रहाणेने ५ चौकार आणि एका षटकारासह ६० धावा केल्या. धवनला शाहबाझ अहमदने तर रहाणेला वॉशिंग्टन सुंदरने बाद केले. मार्कस स्टॉइनिस आणि ऋषभ पंत या दोन फलंदाजांनी दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.