सिडनी - बिग बॅश लीगमध्ये (बीबीएल) होबार्ट हरिकेन्स संघाशी करार केलेला नेपाळचा लेगस्पिनर संदीप लामिछानेला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. बीबीएलचा दहावा हंगाम १० डिसेंबरपासून सुरू होत आहे.
"सर्वांना नमस्कार. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती देण्याचे माझे कर्तव्य आहे. बुधवारपासून माझ्या शरीरावर वेदना होत होत्या. परंतु माझी तब्येत ठीक आहे. जर सर्व काही व्यवस्थित झाले तर मी पुन्हा मैदानात परत येईन'', असे लामिछानेने सांगितले.
संदीप लामिछाने इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या सत्रात दिल्ली कॅपिटल्स संघात होता. परंतु त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. लामिछाने बीबीएलचे सुरुवातीचे चार सामने खेळू शकणार नाही.
डिसेंबरच्या मध्यावर लामिछाने ऑस्ट्रेलियामध्ये दाखल होईल. तिथे पोहोचल्यानंतर दोन आठवड्यांसाठी त्याला क्वारंटाइन राहावे लागेल. २७ डिसेंबर रोजी ब्रिस्बेन हीटशी होणाऱ्या सामन्यासाठी तो उपलब्ध असेल. बीबीएलच्या मागील दोन सत्रात तो मेलबर्न स्टार्सकडून खेळला आहे.
हेही वाचा - ''ऑस्ट्रेलियात भारत वाईट पद्धतीने हरणार'', माजी क्रिकेटपटूचे भाकीत