ETV Bharat / sports

बंगळुरुला नमवून हैदराबाद 'क्लालिफायर'मध्ये, आता गाठ दिल्लीशी - हैदराबाद बंगळुरू

बंगळुरुला नमवून हैदराबाद सनरायजर्सने क्लालिफायरमध्ये प्रवेश मिळवला आहे. आता त्यांची गाठ दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. ६ गडी राखून हैदराबादने बंगळुरुला मात दिली.

हैदराबाद
हैदराबाद
author img

By

Published : Nov 6, 2020, 7:04 PM IST

Updated : Nov 6, 2020, 11:22 PM IST

अबू धाबी - बंगळुरुला नमवून हैदराबाद सनरायजर्सने क्लालिफायरमध्ये प्रवेश मिळवला आहे. आता त्यांची गाठ दिल्ली कॅपिटल्स संघाशी होणार आहे. ६ गडी राखून हैदराबादने बंगळुरुला मात दिली. या पराभवासह RCB चे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले आहे. बंगळुरुने हैदराबादला १३२ धावांचे आव्हान दिले होते. विल्यमसन-होल्डरने संयमी फलंदाजी करत पूर्ण केले. विल्यमसनने नाबाद अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अखेरच्या षटकापर्यंत मैदानावर टिकून राहत विल्यमसनने नाबाद ५० धावा केल्या. त्याला होल्डरने २४ धावा करत मोलाची साथ दिली.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पहिल्या चेंडूपासून हैदराबादने आरसीबीला स्वैर फटकेबाजीची जराही संधी दिली नाही. २० षटकात बंगळुरूच्या संघाला फलकावर १३१ धावा लावता आल्या. ए बी डिव्हिलियर्सची (५६ धावा) अर्धशतकी खेळी आणि अ‌ॅरॉन फिंचच्या ३२ धावा, या दोघांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्याही करता आली नाही.

दोन्ही संघांसाठी आजचा सामना 'करो या मरो'चा होता. त्यात हैदराबादने बाजी मारली आहे. त्यामुळे त्यांचा सामना 'क्वालिफायर-२' मध्ये दिल्ली कॅपिटलशी होणार आहे.'क्वालिफायर-१' मध्ये दिल्लीला हरवून मुंबईचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे.

Last Updated : Nov 6, 2020, 11:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.