ETV Bharat / sports

जाणून घ्या आयपीएलच्या प्रतिष्ठित 'टोप्यां'चे मानकरी

यंदाच्या हंगामात राहुलने सर्वाधिक धावा केल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात राहुलने २९ धावा केल्या. राहुलने १४ सामन्यांत ६७० धावा केल्या आहेत. या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आहे. त्याने मंगळवारी मुंबईविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात नाबाद ८५ धावांची खेळी केली.

ipl 2020 orange cap and purple cap holders
जाणून घ्या आयपीएलच्या प्रतिष्ठित 'टोप्यां'चे मानकरी
author img

By

Published : Nov 4, 2020, 5:22 PM IST

नवी दिल्ली - आयपीएलच्या लीग टप्प्यातील सामन्यांच्या समाप्तीनंतर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार लोकेश राहुलने 'ऑरेंज कॅप' स्वत:कडे राखली आहे. तर, 'पर्पल' कॅप दिल्ली कॅपिटल्सच्या कगिसो रबाडाकडे परतली आहे. रबाडाने मुंबईच्या जसप्रीत बुमराहकडून 'पर्पल कॅप' स्वत:कडे घेतली आहे. लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला 'ऑरेंज कॅप' देण्यात येते. तर, सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाला 'पर्पल कॅप' देण्यात येते.

सेहवागचा रवी शास्त्रींवर गंभीर आरोप, म्हणाला...

यंदाच्या हंगामात राहुलने सर्वाधिक धावा केल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात राहुलने २९ धावा केल्या. राहुलने १४ सामन्यांत ६७० धावा केल्या आहेत. या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आहे. त्याने मंगळवारी मुंबईविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात नाबाद ८५ धावांची खेळी केली. त्याच्या खात्यात १४ सामन्यांत ५२९ धावा आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर दिल्लीचा शिखर धवन असून त्याच्या खात्यात १४ सामन्यात ५२५ धावा आहे.

तर, 'पर्पल' कॅप मिळवणाऱ्या रबाडाने १४ सामन्यांमध्ये एकूण २५ बळी घेतले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर मुंबईचा बुमराह असून त्याने १३ सामन्यात २३ बळी घेतले आहेत. राजस्थान रॉयल्सचा जोफ्रा आर्चरने १४ सामन्यात २० बळी घेत तिसरे स्थान राखले आहे.

प्लेऑफमधील संघाची क्रमवारी -

सद्याच्या घडीला मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहे. पहिल्या स्थानावर मुंबई, दुसऱ्या स्थानावर दिल्ली, तिसऱ्या स्थानावर हैदराबाद आणि चौथ्या स्थानावर बंगळुरूचा संघ आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.