दुबई - आयपीएलच्या तेराव्या हंगामात आज डबल हेडरमधील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यात दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळला जात आहे. बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यात चेन्नईने सलग दोन वर्ष संघात स्थान न दिलेल्या खेळाडूला मैदानात उतरवले आहे.
२०१८मध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या संघात समाविष्ट झालेल्या झारखंडच्या मोनू कुमारला आज पहिल्यांदाच प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. मध्यम गतीचा वेगवान गोलंदाज मोनूव्यतिरिक्त फिरकीपटू अष्टपैलू मिशेल सँटनरलाही संघात स्थान देण्यात आले आहे.
-
#RCB have won the toss and they will bat first against #CSK.#Dream11IPL pic.twitter.com/1MVCrAI78S
— IndianPremierLeague (@IPL) October 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#RCB have won the toss and they will bat first against #CSK.#Dream11IPL pic.twitter.com/1MVCrAI78S
— IndianPremierLeague (@IPL) October 25, 2020#RCB have won the toss and they will bat first against #CSK.#Dream11IPL pic.twitter.com/1MVCrAI78S
— IndianPremierLeague (@IPL) October 25, 2020
मोनूची कारकीर्द -
२५ वर्षीय मोनू कुमार हा मुळचा झारखंडची राजधानी रांची म्हणजे धोनीच्या शहरातील रहिवासी आहे. २०१४ साली तो १९ वर्षांखालील भारतीय संघाचा भाग होता. त्याने आतापर्यंत १० अ दर्जाचे सामने खेळत ११ विकेट्स घेतल्या आहेत. तर, २२ देशांतर्गत टी-२० सामने खेळत २५ विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. आज बंगळुरूचा संघ ग्रीन जर्सीमध्ये मैदानात उतरला आहे. बंगळुरूचा संघ दरवर्षी 'गो ग्रीन इनिशिएटिव्ह'साठी एक सामना ग्रीन जर्सीमध्ये खेळतो.