आबुधाबी - इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) तेराव्या हंगामात आज गतविजेता मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स आमने-सामने येणार आहेत. दोन्ही संघांचा या हंगामातील हा दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात मुंबईने विजय मिळवला होता.
आकडेवारी पाहता मुंबईचे पारडे जड आहे. कारण त्यांच्या संघातील खेळाडूंचे संतुलन आणि त्यांचा फॉर्म. दुसऱ्या बाजूला कोलकात्याचा संघ अद्याप प्रभावी ताळमेळ दाखवू शकलेला नाही. सलामीच्या जोडीबाबत कोलकात्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. सुरुवातीला त्यांनी सुनील नरेन आणि शुबमन गिलची जोडी सलामीला उतरवली. त्यानंतर राहुल त्रिपाठी आणि गिलला आजमावून पाहिले. गेल्या सामन्यात टॉम बेंटनलाही संधी मिळाली होती. मात्र, तो अपयशी ठरला. सध्या शुबमन गिल हा एकमेव 'इन फॉर्म' फलंदाज कोलकात्याकडे आहे.
कर्णधार दिनेश कार्तिकने एका सामन्यात अर्धशतक झळकावले. मात्र, त्यानंतर तो पुन्हा अपयशी ठरला. आंद्रे रसेलनेही आतापर्यंत विशेष कामगिरी केलेली नाही. ही कोलकात्यासाठी सर्वात निराशाजनक बाब आहे.
गोलंदाजीचा विचार केला तर, कोलकात्यासाठी अडचण नाही. कमलेश नागरकोटी, प्रसिद्ध कृष्णा आणि शिवम मावी यांनी अनुभवी पॅट कमिन्स व रसेलच्या सोबतीने चांगली कामगिरी केली आहे. गोलंदाजांची ही फौज आज मुंबईच्या फलंदाजांना रोखण्यात यशस्वी होते की नाही, हे आजच्या सामन्यात समजेल.
मुंबईच्या संघाचा विचार केला तर, त्यांचा प्रत्येक फलंदाज फॉर्ममध्ये आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डि कॉक यांच्या सलामी फारशी यशस्वी ठरली नाही. मात्र, दोघांपैकी एक स्कोअर बोर्ड हलता ठेवतो. सूर्यकुमार यादव, ईशान किशन यांनी आपली जबाबदारी जोखपणे पार पाडली आहे. केरॉन पोलार्ड, हार्दिक पांड्या और कृणाल पांड्याही धावा जमा करण्यात यशस्वी झाले आहेत.
गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्टची जोडगोळी कोलकात्याच्या फलंदाजांसाठी धोकादायक ठरू शकते. पोलार्ड, राहुल चहर आणि कृणाल यांनी देखील आतापर्यंत चांगली कामगीरी केली आहे.
यातून निवडणार संघ -
कोलकाता नाइट रायडर्स - दिनेश कार्तिक (कर्णधार ), आंद्रे रसेल, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्यूसन, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंह, संदीप वारियर, शिवम मावी, शुबमन गिल, सिद्धेश लाड, सुनील नरेन, पॅट कमिंन्स, इयॉन मॉर्गन, वरुण चक्रवर्ती, टॉम बँटन, राहुल त्रिपाठी, ख्रिस ग्रीन, एम सिद्धार्थ, निखिल नाईक
मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डि कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, हार्दिक पांड्या, केरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, जेम्स पॅटिनसन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रित बुमराह, अनमोलप्रीत सिंह, क्रिस लिन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, ईशान किशन, जयंत यादव, मिशेल मॅक्लेंघन, मोहसिन खान, नाथन कुल्टर नाईल, प्रिंस बलवंत राय, आदित्य तारे, राहुल चहर, सौरभ तिवारी, शेरफाने रुदरफोर्ड.