अबुधाबी - आयपीएलमध्ये हंगामाचा २१ वा सामना शेख झायेद मैदानावर कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगला. या सामन्यात कोलकाताने प्रथम फलंदाजी करत चेन्नईला विजयासाठी १६८ धावांचे आव्हान दिले. चेन्नई संघातील मधल्या फळीतील खेळाडूंच्या निराशजनक कामगिरीमुळे कोलकाता नाइट रायडर्सने 10 धावांनी सामना जिंकला. या हंगामात आतापर्यंत कोलकाताने ५ पैकी 3 सामने जिंकले आहेत आणि २ सामने गमावले आहेत. दुसरीकडे चेन्नईने ६ पैकी केवळ २ सामने जिंकले आहेत.
धोनीसेनेच्या 'सुपर' गोलंदाजीमुळे कोलकाताला २० षटकात १६७ धावांपर्यंत मजल मारता आली. नाणेफेक जिंकून कोलकाताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात सुनिल नरिनच्या बदली राहुल त्रिपाठीला सलामीला पाठवण्यात आले. राहुलने या संधीचे सोने करत ८ चौकार आणि ३ षटकारांसह ८१ धावा केल्या. कोलकाताचा दुसरा सलामीवीर शुबमन गिल (११) अपयशी ठरला. त्याला शार्दुल ठाकुरने बाद केले. तर, मधल्या फळीत नितीश राणा (९), सुनिल नरिन(१७), इयान मॉर्गन (७), आंद्रे रसेल (२) यांनाही चांगली कामगिरी करता आली नाही. कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिक सातव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. मात्र, त्यालाही मोठे योगदान देता आले नाही. २० षटकात कोलकाताचे सर्व फलंदाज बाद झाले. चेन्नईकडून सॅम करन, शार्दुल ठाकुर, कर्ण शर्मा यांना प्रत्येकी दोन बळी घेता आले. तर, ड्वेन ब्रावोने ३७ धावांमध्ये कोलकाताच्या तीन फलंदाजांना माघारी धाडले.
लक्षाचा पाठलाग करताना चेन्नईचा सलामीवीर शेन वॉटसनने चांगली सुरूवात केली. वॉटसन ५० धावा करून बाद झाला. त्यानतंर फाफ डु प्लेसिस आणि अंबाटी रायुडू या दोघांनी खेळ सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी अनुक्रमे १७ आणि ३० धावा केल्या. धोनी देखील फार काळ टिकला नाही. केवळ ११ धावा काढून वरुण चक्रवर्तीने माघारी पाठवले. अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने नाबाद आक्रमक खेळी करत ८ चेंडूत २१ धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जने पाच गडी गमावत 20 षटकात १५७ धावा काढल्या. कोलकाताने १० धावांनी सामना जिंकला.
LIVE UPDATE :
- चेन्नईला ४२ चेंडूत ६७ धावांची गरज.
- शेन वॉटसनचे अर्धशतक. खेळीत ६ चौकार आणि एक षटकार.
- महेंद्रसिंह धोनी मैदानात.
- तेराव्या षटकात रायुडू ३० धावांवर बाद, नागरकोटीला मिळाला बळी.
- चेन्नईला ६० चेंडूत ७८ धावांची गरज.
- वॉटसन ४७ तर, रायुडू २४ धावांवर नाबाद.
- दहा षटकात चेन्नईच्या १ बाद ९० धावा.
- वॉटसन-रायुडू खेळपट्टीवर स्थिरावले.
- सहा षटकानंतर वॉटसन २६ तर, रायुडू ९ धावांवर नाबाद.
- पाच षटकानंतर चेन्नईच्या १ बाद ४१ धावा.
- अंबाटी रायुडू मैदानात.
- शिवम मावीला मिळाला प्लेसिसचा बळी.
- चेन्नईला पहिला धक्का, प्लेसिस बाद.
- तीन षटकानंतर चेन्नईच्या बिनबाद २५ धावा.
- पहिल्या षटकात चेन्नईच्या बिनबाद ६ धावा.
- शेन वॉटसनकडून डावाचा पहिला चौकार.
- पॅट कमिन्स टाकतोय कोलकाताकडून पहिले षटक.
- चेन्नईचे सलामीवीर शेन वॉटसन आणि फाफ डु प्लेसिस मैदानात.
- २० षटकात कोलकाताच्या सर्वबाद १६७ धावा.
- शेवटच्या षटकात शिवम मावी बाद, ब्रावोचा तिसरा बळी.
- कार्तिक आणि नागरकोटी बाद.
- कमिन्स मैदानात.
- राहुल त्रिपाठी ८१ धावांवर बाद, ब्रावोला मिळाली विकेट.
- कोलकाताचा कर्णधार मैदानात.
- शार्दुल ठाकुरने रसेलला केले झेलबाद.
- कोलकाताचा पाचवा गडी बाद, रसेल स्वस्तात माघारी.
- पंधरा षटकानंतर कोलकाताच्या ४ बाद १२८ धावा.
- रसेल मैदानात.
- सॅम करनच्या गोलंदाजीवर मॉर्गन झेलबाद.
- राहुल ५८ तर, मॉर्गन ६ धावांवर नाबाद.
- तेरा षटकानंतर कोलकाताच्या ३ बाद १०९ धावा.
- कर्ण शर्माचा नरिनच्या रुपात दुसरा बळी.
- जडेजाने टिपला नरिनचा सुंदर झेल, मॉर्गन मैदानात.
- दहा षटकात कोलकाताच्या २ बाद ९३ धावा.
- राहुल त्रिपाठीचे सुंदर अर्धशतक, खेळीत ६ चौकार आणि २ षटकार.
- सुनिन नरिन फलंदाजीसाठी मैदानात.
- नितीश राणाच्या ९ धावा.
- कोलकाताला दुसरा धक्का, नितीश राणा कर्ण शर्माच्या गोलंदाजीवर माघारी.
- सहा षटकानंतर राहुल ३१ तर, नितीश ६ धावांवर नाबाद.
- राहुल त्रिपाठीकडून डावाचा पहिला षटकार.
- पाच षटकानंतर कोलकाताच्या १ बाद ४१ धावा.
- नितीश राणा मैदानात.
- शार्दुल ठाकुरने शुबमनला केले बाद.
- कोलकाताला पहिला धक्का, शुबम ११ धावांवर बाद.
- पहिल्या षटकात कोलकाताच्या बिनबाद ७ धावा.
- राहुलकडून डावाचा पहिला चौकार.
- दीपक चहर टाकतोय सामन्याचे पहिले षटक.
- कोलकाताकडून राहुल त्रिपाठी आणि शुबमन गिल हे सलामीवीर.
- कोलकाताचे सलामीवीर मैदानात.
- नाणेफेक जिंकून कोलकाताचा फलंदाजीचा निर्णय.
- थोड्याच वेळात होणार नाणेफेक.
चेन्नई सुपर किंग्जची प्लेईंग XI -
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार, यष्टीरक्षक), अंबाटी रायुडू, फाफ डु प्लेसिस, शेन वॉटसन, केदार जाधव, ड्वेन ब्रावो, रवींद्र जडेजा, दीपक चहर, कर्ण शर्मा, शार्दुल ठाकुर, सॅम करन.
कोलकाता नाइट रायडर्सची प्लेईंग XI -
दिनेश कार्तिक (कर्णधार यष्टीरक्षक), आंद्रे रसेल, कमलेश नागरकोटी, नितीश राणा, शिवम मावी, शुबमन गिल, सुनिल नरिन, पॅट कमिन्स, इयॉन मॉर्गन, वरुण चक्रवर्ती, राहुल त्रिपाठी.