शारजाह - दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने शनिवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात एक मोठी कामगिरी केली. आयपीएलमध्ये ५० बळी घेणारा रबाडा हा वेगवान गोलंदाज ठरला आहे. या विक्रमात त्याने लसिथ मलिंगा आणि सुनील नरिन यांना पाठी सोडले. शनिवारी त्याने तीन षटकांत एक बळी घेतला. त्याने डावाच्या १५व्या षटकात फाफ डु प्लेसिसला बाद केले.
-
💙 Fastest to 5⃣0⃣ @IPL wickets 💙
— Delhi Capitals (Tweeting from 🇦🇪) (@DelhiCapitals) October 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
This is @KagisoRabada25's world and we're only living in it 🌍🙌#DCvCSK #Dream11IPL #YehHaiNayiDilli pic.twitter.com/ZEgkhq3KVF
">💙 Fastest to 5⃣0⃣ @IPL wickets 💙
— Delhi Capitals (Tweeting from 🇦🇪) (@DelhiCapitals) October 17, 2020
This is @KagisoRabada25's world and we're only living in it 🌍🙌#DCvCSK #Dream11IPL #YehHaiNayiDilli pic.twitter.com/ZEgkhq3KVF💙 Fastest to 5⃣0⃣ @IPL wickets 💙
— Delhi Capitals (Tweeting from 🇦🇪) (@DelhiCapitals) October 17, 2020
This is @KagisoRabada25's world and we're only living in it 🌍🙌#DCvCSK #Dream11IPL #YehHaiNayiDilli pic.twitter.com/ZEgkhq3KVF
आयपीएलमध्ये ५० बळी घेण्यासाठी रबाडाने सर्वात कमी सामने खेळले आहेत. रबाडाने २७ सामन्यात ही कामगिरी नोंदवली. सुनील नरिनने आयपीएलमध्ये ३२ सामन्यांत ५० बळी घेतले आहेत. तसेच रबाडाने सर्वात कमी चेंडूंमध्ये ५० बळी घेतले आहेत. ६१६ चेंडूत त्याने ५० फलंदाजांना माघारी धाडले. तर, मलिंगाने ७४९ चेंडूंत ५० विकेट्स घेतल्या आहेत.
आयपीएलमध्ये चेन्नईविरूद्ध झालेल्या सामन्यात दिल्लीने ५ गडी राखून विजय नोंदवला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने २० षटकांत ४ गडी गमावून १७९ धावा केल्या. दिल्लीने पाच विकेट गमावून हे लक्ष्य गाठले. दिल्लीकडून सलामीवीर शिखर धवनने ५८ चेंडूंत नाबाद १०१ धावा केल्या. धवनचे हे आयपीएलमधील पहिले शतक आहे. या खेळीत त्याने १४ चौकार आणि एक षटकार लगावला.