ETV Bharat / sports

धोनीला पंचांशी हुज्जत घालणे पडले महाग; आयपीएलने केली कारवाई

नेहमी कॅप्टन 'कुल' म्हणून ओळखला जाणाऱ्या धोनीचे हे 'अँग्री' रूप सर्वानाच आश्चर्यचकित करणारे होते.

author img

By

Published : Apr 12, 2019, 12:53 PM IST

Updated : Apr 12, 2019, 12:58 PM IST

पंचांशी हुज्जत घालणे धोनीला पडले महाग

जयपूर - आयपीएलमध्ये जयपूरच्या सवाई मानसिंग मैदानावर गुरूवारी खेळल्या गेलेल्या राजस्थान आणि चेन्नईविरूद्धच्या सामन्यात चेन्नईने शेवटच्या चेंडूवर षटकार खेचत ४ विकेटने थरारक विजय मिळवला. चेन्नईच्या या रोमहर्षक विजयापेक्षा चर्चा झाली ती कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या मैदानावरील त्या कृत्याची.

या सामन्यात चेन्नईलाअखेरच्या षटकात विजयासाठी 18 धावांची गरज होती. या षटकात बेन स्टोक्सने टाकलेला चौथा चेंडू पंचांनी 'नो बॉल' न दिल्याने , संतापलेला चेन्नईचा कर्णधार धोनी चक्क सामना चालू असताना डग आउटमधून मैदानात येत पंचांना जाब विचारु लागला. नेहमी कॅप्टन 'कुल' म्हणून ओळखला जाणारा धोनीचे हे 'अँग्री' रूप सर्वानाच आश्चर्य चकित करणारे होते.सामना झाल्यानंतर आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत धोनीवर कारवाई करण्यात आली आहे. कारवाई म्हणून धोनीला सामन्यातील ५० टक्के मानधनाचा दंड आयपीएलकडून करण्यात आला आहे.धोनीच्या या अश्या वागण्याची पूर्ण क्रिकेट वर्तुळात चर्चा होत आहे. काहींनी पंचांना दोषी धरत धोनीचे समर्थन केले तर काहींनी धोनीचे हे वागणे खूप चुकीचे असल्याचे म्हटले आहे. सामना चालू असताना मैदानात येणे हे नियमबाह्य असल्याने धोनीचे चुकीचेच आहे. खेळाडूपेक्षा खेळ आणि त्याचे नियम कधीही मोठे असतात, नियम तोडणे हे कधीही चुकीचेच आहे. त्यामुळे धोनी हा चुकलाच असे अनेक क्रिकेटप्रेमी तसेच दिग्गज खेळाडू सांगत आहेत.

Intro:Body:

ipl action on ms dhoni

पंचांशी हुज्जत घालणे धोनीला पडले महाग, आयपीएलने केली कारवाई

जयपूर - गुरूवारी आयपीएलमध्ये जयपूरच्या सवाई मानसिंग मैदानावर झालेल्या राजस्थान आणि चेन्नईविरूद्धच्या सामन्यात चेन्नईने शेवटच्या चेंडूवर षटकार खेचत ४ विकेटने थरारक विजय मिळवला. चेन्नईच्या या रोमहर्षक विजयापेक्षा चर्चा झाली ती कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या मैदानावरील त्या कृत्याची.

या सामन्यात चेन्नईलाअखेरच्या षटकात विजयासाठी 18 धावांची गरज होती. या षटकात बेन स्टोक्सने टाकलेला चौथा चेंडू पंचांनी 'नो बॉल' न दिल्याने , संतापलेला चेन्नईचा कर्णधार धोनी चक्क सामना चालू असताना डग आउटमधून मैदानात येत पंचांना जाब विचारु लागला. नेहमी कॅप्टन 'कुल' म्हणून ओळखला जाणारा धोनीचे हे 'अँग्री' रूप सर्वानाच आश्चर्य चकित करणारे होते.

सामना झाल्यानंतर आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत धोनीवर कारवाई करण्यात आली आहे. कारवाई म्हणून धोनीला सामन्यातील 50 टक्के मानधनाचा दंड आयपीएलकडून करण्यात आला आहे.

धोनीच्या या अश्या वागण्याची पूर्ण क्रिकेट वर्तुळात चर्चा होत आहे. काहींनी पंचांना दोषी धरत धोनीचे समर्थन केले तर काहींनी धोनीचे हे वागणे खूप चुकीचे असल्याचे म्हटले आहे. सामना चालू असताना मैदानात येणे हे नियमबाह्य असल्याने धोनीचे चुकीचेच आहे. खेळाडूपेक्षा खेळ आणि त्याचे नियम कधीही मोठे असतात, नियम तोडणे हे कधीही चुकीचेच आहे. त्यामुळे धोनी हा चुकलाच असे अनेक क्रिकेटप्रेमी तसेच दिग्गज खेळाडू सांगत आहेत.

https://twitter.com/IPL/status/1116543966210658304?s=19

Conclusion:
Last Updated : Apr 12, 2019, 12:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.