ETV Bharat / sports

धोनी-रायडूंच्या चमकदार कामगिरीने चेन्नईचा रॉयल्सलवर ४ गडी राखून विजय

कर्णधार धोनीने मैदानावर धाव घेत अंपायरबरोबर वाद घातला. तरीही अंपायरने निर्णय बदलला नाही

author img

By

Published : Apr 12, 2019, 1:41 AM IST

चेन्नई सुपर किंग्ज

जयपूर - चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सला जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअममधील आयपीएल सामन्यात पराभूत केले. ४ गडी राखून विजय मिळविल्याने चेन्नईची विजयी घौडदौड कायम राहिली आहे.

नाणेफेक हरल्यानंतर महेंद्रसिंग धोनी गोलदांजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्सच्या संघाने २० षटकात ७ गडी गमावून १५२ धावांचे लक्ष्य चेन्नई संघाला दिले. चेन्नई संघाने २० षटकात ६ गडी गमावून १५५ धावा काढून राजस्थान संघाला पराभवाची धूळ चारली.

रोमांचक सामना-

शेवटच्या षटकामुळे सामना रोमांचक झाला. शेवटच्या षटकात चेन्नईला विजयासाठी १८ धावांची आवश्यकता होती. रवींद्र जडेजाने बेन स्टोक्सच्या पहिल्या चेंडूतच षटकार ठोकून संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. दुसरा चेंडू नो बॉल आल्यानंतर एक धाव काढण्यात आली. महेंद्र सिंह धोनी हा ५८ धावा काढून स्टोक्सच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला.चौथ्या चेंडूवर मिशेल सेंटनरने दोन धावा काढल्या. हा नॉ बॉल देण्यात यावा, अशी चेन्नई संघाने मागणी केली. याचवेळी कर्णधार धोनीने मैदानावर धाव घेत अंपायरबरोबर वाद घातला. तरीही अंपायरने निर्णय बदलला नाही. यावेळी चेन्नई संघात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

पाचव्या चेंडूवर सेंटनरने आणखी दोन धावा काढल्या. शेवटच्या चेंडुत चार धावा काढण्याची आवश्यकता होती. हा चेंडू वाईड देण्यात आला. शेवटच्या चेंडुत तीन धावा काढण्याचे लक्ष्य असताना सेंटनरने षटकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला. चेन्नईकडून अंबाती रायुडू आणि महेंद्रसिंह धोनी यांनी अर्धशतकी खेळी केल्याने ते विजयाचे शिल्पकार ठरले आहेत.

Intro:Body:

धोनी-रायडूंच्या चमकदार कामगिरीने चेन्नईचा रॉयल्सलवर ४ गडी राखून विजय

जयपूर - चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सला जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअममधील आयपीएल सामन्यात पराभूत केले. ४ गडी राखून विजय मिळविल्याने चेन्नईची विजयी घौडदौड कायम राहिली आहे.

नाणेफेक हरल्यानंतर महेंद्रसिंग धोनी गोलदांजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्सच्या संघाने २० षटकात ७ गडी गमावून १५२ धावांचे लक्ष्य चेन्नई संघाला दिले. चेन्नई संघाने २० षटकात ६ गडी गमावून १५५ धावा काढून राजस्थान संघाला पराभवाची धूळ चारली.

शेवटच्या षटकात चेन्नईला १८ धावांची आवश्यकता होती. रवींद्र जडेजाने बेन स्टोक्सच्या पहिल्या चेंडूतच षटकार ठोकून संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. दुसरा चेंडू नो बॉल आल्यानंतर एक धाव काढण्यात आली. महेंद्र सिंह धोनी हा ५८ धावा काढून स्टोक्सच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला.

चौथ्या चेंडूवर मिशेल सेंटनरने दोन धावा काढल्या. हा नॉ बॉल देण्यात यावा, अशी चेन्नई संघाने मागणी केली. याचवेळी कर्णधार धोनीने मैदानावर धाव घेत अंपायरबरोबर वाद घातला. तरीही अंपायरने निर्णय बदलला नाही. यावेळी चेन्नई संघात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

पाचव्या चेंडूवर सेंटनरने आणखी दोन धावा काढल्या. शेवटच्या चेंडुत चार धावा काढण्याची आवश्यकता होती. हा चेंडू वाईड देण्यात आला. शेवटच्या चेंडुत तीन धावा काढण्याचे लक्ष्य असताना सेंटनरने षटकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला. चेन्नईकडून अंबाती रायुडू आणि महेंद्रसिंह धोनी यांनी अर्धशतकी खेळी केल्या.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.