लाहोर - पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इंझमाम उल हक याला हृदयविकाराचा झटका आला. तेव्हा त्याच्या कुटुंबियांनी त्याला रूग्णालयात दाखल केले. तेव्हा डॉक्टरांनी इंझमाम याच्यावर एंजियोप्लास्टी सर्जरी केली आहे. आता इंझमान याची प्रकृती स्थिर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंझमाम याला मागील तीन दिवसांपासून छातीत दुखत होते. परंतु सुरूवातीच्या तपासणीत याचे कारण समोर आले नव्हते. परंतु सोमवारी करण्यात आलेल्या चाचणीतून लक्षात आले की, त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्याच्यावर सर्जरी करण्यात आली.
इंझमाम याच्या जवळच्या नातेवाईकांनी माहिती दिली की, इंझमामची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, इंझमाम 51 वर्षीय आहे. त्याने पाकिस्तानकडून 375 एकदिवसीय आणि 119 कसोटी सामने खेळली आहेत. यात त्याने एकदिवसीयमध्ये 11 हजार 701 धावा केल्या आहेत. तर कसोटीत त्याच्या नावे 8 हजार 829 धावा आहेत. इंझमामने 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.
हे ही वाचा - MI vs PBKS : मुंबई-पंजाब यांच्यात आज टॉप-4 साठी कडवी झुंज
हे ही वाचा - RR VS SRH : हैदराबादचा राजस्थानवर सात गड्यांनी विजय; जेसन रॉय आणि केन विल्यमसन यांची अर्धशतके
हे ही वाचा - IPL 2021 : केकेआर खरेचं कौतुकास पात्र आहे - महेंद्रसिंग धोनी