आज पार पडलेल्या भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया यांच्यातील सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाने ५ गडी गमवत १५२ धावा केल्या आणि भारतासमोर विजयासाठी १५३ धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान लीलया पेलत भारताने दणदणीत विजय साकारला आहे.
रोहित शर्माची झुंझार खेळी
आघाडीचे फलंदाज केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी खेळाला दमदार सुरुवात केली. एश्टन अगरने टाकलेला चेंडू फटकावत असताना केएल राहुलने वॉर्नरच्या हातात झेल दिला. 39 धावावर तो बाद झाल्यानंतर रोहित शर्माच्या जोडीला सुर्यकुमार यादव आला. रोहितने आपली झंझावती खेळ करीत 60 धावा करीत भारताचा विजय सुकर बनवला. विजयासाठी 26 धावांची गरज असताना रोहित निवृत्त झाला आणि हार्दिक पांड्यावर विजयाची जबाबदारी सोपवून तंबूत परतला.
सुर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी विजय साकारण्याची कामगिरी फत्ते केली. यादवने 38 व हार्दिकने 14 धावा करुन भारतासमोर विजयासाठी आवश्यक असलेले १५३ धावांचं आव्हान सहज पार केले.
यापूर्वी झालेल्या सराव सामन्यात भारताने इंग्लंडचा पराभव केला होता. आज ऑस्ट्रेलियाला हरवत भारताने आपला दुसरा विजय नोंदवला आहे.
भारतासमोर विजयासाठी १५३ धावांचं आव्हान
टी २० विश्वचषक सुरू होण्यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आज सराव सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने ५ गडी गमवत १५२ धावा केल्या आणि भारतासमोर विजयासाठी १५३ धावांचं आव्हान दिलं होतं. भारताकडून या सामन्याचं नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. हा सराव सामना असल्याने व प्लेईंग इलेव्हनचं बंधन नसल्यामुने विराट कोहलीने गोलंदाजी केली. भारताने यापूर्वीच्या सराव सामन्यात इंग्लंडचा पराभव केला होता.
ऑस्ट्रेलिया संघाच्या डेविड वॉर्नर, एरॉन फिंच, मिशेल मार्श या आघाडीच्या फलंदाजांनी रिशाजनक कामगिरी केली. मात्र स्टीवन स्मिथ याने 57 धावा, ग्लेन मॅक्सवेलने 37 व मार्कस स्टोइनिस याने नाबाद 41 धावांचे योगदान देत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. यामुळे ऑस्ट्रेलियाने ५ गडी गमवत १५२ धावा केल्या आणि भारतासमोर विजयासाठी १५३ धावांचं आव्हान दिलं होतं.
दोन्ही संघातील खेळाडू
भारतीय संघ - केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, ऋषभ पंत, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, राहुल चाहर, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकुर, वरुण चक्रवर्ती
ऑस्ट्रेलिया - डेविड वॉर्नर, एरॉन फिंच, मिशेल मार्श, स्टीवन स्मिथ, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू वॅड, एश्टन अगर, मिशेल स्टार्क, केन रिचर्डसन, एडम झाम्पा, ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स
हेही वाचा - टी-20 विश्वचषक : भारत-पाकिस्तान सामन्याला ग्रहण, राऊत-ओवैसींसह या नेत्यांचा विरोध