ETV Bharat / sports

Ind Vs Eng : लॉर्ड्सवर भारताचा इंग्लंडविरुद्ध 151 धावांनी विजय, पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी - इंग्लंडचा पराभव

लॉर्ड्सवर भारताचा इंग्लंडविरुद्ध 151 धावांनी विजय झाला आहे. यावेळी मोहम्मद शमी, केएल राहुलची निर्णयाक खेळी झाली आहे.

MATCH
MATCH
author img

By

Published : Aug 17, 2021, 12:18 AM IST

लंडन - लॉर्ड्सवर भारताचा इंग्लंडविरुद्ध (Indi vs England) 151 धावांनी विजय झाला आहे. यावेळी मोहम्मद शमी, केएल राहुलची निर्णयाक खेळी झाली आहे.

सामन्यात भारतीय गोलंदाजांनी मजबूत खेळ खेळला. भारताकडून मोहम्मद सिराजने 4, इशांतने 3 तर मोहम्मद शमीने 1 बळी घेत इंग्लंडच्या डावाला सुरूंग लावला. पहिल्या डावात शतकी खेळी करणाऱ्या भारताच्या लोकेश राहुलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. भारताने या विजयासह पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताने इंग्लंडसमोर 272 धावांचे आव्हान ठेवले होते. ते इंग्लंड पूर्ण करू शकला नाही.

भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सवर खेळवण्यात येत असलेला दुसरा कसोटी सामना रंगतदार स्थितीत पोहोचला आहे. चौथ्या दिवसाअखेर भारतीय संघाने दुसऱ्या डावात ६ गडी बाद १८१ धावा केल्या होत्या. पाचव्या दिवशी सकाळी ऋषभ पंत (२२) लवकर बाद झाला. त्यानंतर भारताचा डाव लवकर आटोपणार असे सर्वांना वाटत होते. तेव्हा जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी नवव्या गड्यासाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी उभारली. मोहम्मद शमीने दमदार खेळी केली. त्याने नाबाद 56 धावा केल्या. तर जसप्रीत बुमराह 34 धावांवर नाबाद राहिला. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने आपला दुसरा डाव 298 धावांवर घोषित केला आणि इंग्लंडला विजयासाठी 272 धावांचे लक्ष्य मिळाले होते. ते आव्हान इंग्लंड पूर्ण करू शकला नाही.

इंग्लंडचा पहिला डाव

इंग्लंडचा कर्णधार जो रूटच्या १८० धावांच्या नाबाद खेळीमुळे संपूर्ण इंग्लंडचा पहिल्या डावात ३९१ धावांवर खेळ आटोपला. पहिल्या डावाच्या जोरावर इंग्लिश संघाने २७ धावांची आघाडी घेतली. रूटसमोर भारतीय गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरले आणि तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात टीम इंडियाला एकही विकेट मिळाली नाही. मात्र, चहापानानंतर इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज यांच्या गोलंदाजीमुळे भारतीय संघाने सामन्यात पुनरागमन केले. रूटने आपल्या खेळीत १८ चौकार ठोकले. त्याच्याव्यतिरिक्त जॉनी बेअरस्टोने ७ चौकारांसह ५७ तर रोरी बर्न्सने ४९ धावांची खेळी केली. मोहम्मद सिराजने ४ बळी घेतले. याशिवाय इशांत शर्मालाही ३ बळी घेता आले.

भारताचा पहिला डाव

केएल राहुलच्या १२९ धावांच्या मदतीने भारताने पहिल्या डावात ३६४ धावा केल्या. रोहित शर्माने ८३ तर कर्णधार विराट कोहलीनेही ४२ धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने ५ बळी घेतले. त्याने आपल्या कारकिर्दीत ३१व्यांदा पाच बळी घेण्याचा पराक्रम केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.