ETV Bharat / sports

सुर्यकुमार यादवला अंतिम संघात स्थान द्या, दिलीप वेंगसकरचा सल्ला - सुर्यकुमार यादव

भारतीय संघाला फलंदाजी लाइन अप अधिक मजबूत करण्याची गरज आहे. ज्यात हनुमा विहारी ऐवजी सुर्यकुमार यादवला संघात स्थान दिले पाहिजे. भारतीय संघाने एक गोलंदाज कमी करून सहा फलंदाजांसह मैदानात उतरले पाहिजे, असा सल्ला दिलीप वेंगसकर यांनी दिला आहे.

Indian team should play Surya at Oval as sixth batsman: Dilip Vengsarkar
सुर्यकुमार यादवला अंतिम संघात स्थान द्या, दिलीप वेंगसकरचा सल्ला
author img

By

Published : Aug 29, 2021, 3:46 PM IST

Updated : Aug 29, 2021, 4:27 PM IST

मुंबई - इंग्लंडने लीड्स कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा एक डाव आणि 76 धावांनी पराभव केला. या दारूण पराभवानंतर विराट कोहलीने आमची फलंदाजी खोलपर्यंत नसल्याचे म्हटलं होतं. यावर भारताच्या माजी दिग्गजाने त्याला एक अतिरिक्त फलंदाज खेळवण्याचा सल्ला दिल्ला आहे.

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघात बदल होणार हे जवळपास निश्चित आहे. अशात भारताचे माजी दिग्गज क्रिकेटर दिलीप वेंगसकर यांनी भारतीय संघाला एक सल्ला दिला आहे. वेंगसकर याच्या सल्ल्यामुळे भारतीय संघाच्या अडचणी कमी होऊ शकतात.

दिलीप वेंगसकर यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, भारतीय संघाने फलंदाजी लाईन अप अधिक मजबूत करण्याची गरज आहे. ज्यात हनुमा विहारी ऐवजी सुर्यकुमार यादवला संघात स्थान दिले पाहिजे. भारताने एक गोलंदाज कमी करून सहा फलंदाजांसह मैदानात उतरले पाहिजे.

दिलीप वेंगसकरच्या मते, सुर्यकुमार यादवमध्ये ती प्रतिभा आहे. ज्याचा भारतीय संघाला जास्त फायदा होऊ शकतो.

स्किलमध्ये सूर्यकुमार यादव भारतीय संघासाठी सर्वश्रेष्ठ आहे. तो मागील काही काळापासून संघात आहे. आणखी उशीर होण्याआधी त्याला संघात स्थान देण्याची गरज आहे, असे देखील वेंगसकर म्हणाले.

दरम्यान, सुर्यकुमार यादवने श्रीलंकाविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची निवड भारतीय संघात करण्यात आली.

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्याची मालिका खेळवण्यात येत आहे. यातील 3 सामने पार पडले असून ही मालिका 1-1 अशा बरोबरीत आहे. उभय संघातील चौथा सामन्याला 2 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे.

हेही वाचा - Ind vs Eng : रोहित शर्मा बाद झाल्यानंतर चाहता फलंदाजीसाठी मैदानात घुसला, पाहा व्हिडिओ

हेही वाचा - IND vs ENG 3rd test : भारताचा दारूण पराभव, इंग्लंड 1 डाव 76 धावांनी विजयी

Last Updated : Aug 29, 2021, 4:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.