स्टैवैगनर (नार्वे) - भारताचा ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंद सध्या यशाच्या शिखरावर आहे. 16 वर्षीय आर. प्रज्ञानंदने आता जागतिक स्पर्धेत आणखी एक विजयी कामगिरी केली आहे. नॉर्वे खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या अ गटात आर. प्रज्ञानंदने सर्वाधिक 7.5 गुण मिळवत विजयी झाला आहे. त्याने व्ही प्रणितला पराभूत केलं ( pragnanandha wins norwegian chess open ) आहे.
प्रज्ञानंदने दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मार्सेल एफ्रोइम्स्की (इस्त्रायल) आणि जंग मिन सेओ (स्वीडन) यांच्यापेक्षा एक गुण पुढे आहे. प्रणित सहागुणांसह तिसऱ्या क्रमांकावर होता. मात्र, टायब्रेकच्या कमी गुणांमुळे तो सहाव्या स्थानी घसरला.
-
Congratulations to Praggnanandhaa, who won the #NorwayChess Open Tournament after scoring 7,5 out of 9. He finished one point ahead of nearest rivals Marsel Efroimski and Jung Min Seo, who shared second place. pic.twitter.com/zLJWEAfwAw
— Norway Chess (@NorwayChess) June 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Congratulations to Praggnanandhaa, who won the #NorwayChess Open Tournament after scoring 7,5 out of 9. He finished one point ahead of nearest rivals Marsel Efroimski and Jung Min Seo, who shared second place. pic.twitter.com/zLJWEAfwAw
— Norway Chess (@NorwayChess) June 10, 2022Congratulations to Praggnanandhaa, who won the #NorwayChess Open Tournament after scoring 7,5 out of 9. He finished one point ahead of nearest rivals Marsel Efroimski and Jung Min Seo, who shared second place. pic.twitter.com/zLJWEAfwAw
— Norway Chess (@NorwayChess) June 10, 2022
नॉर्व्हे खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत प्रज्ञानंदने सुरुवातीपासून दमदार कामगिरी केली होती. त्याने प्रणितसोबतच व्हिक्टर मिखालेव्हस्की (आठवी फेरी), विटाली कुनिन (सहावी फेरी), मुखमदझोखिद सुयारोव (चौथी फेरी), सेमेन मुतुसोव्ह (दुसरी फेरी) आणि मॅथियास अनेलँड (पहिली फेरी) यांचा पराभव केला. तर, तीन सामने अनिर्णित राहिले आहे.
दरम्यान, प्रज्ञानंदने 2018 साली ग्रँडमास्टरचे विजेतेपद मिळवले होते. ही कामगिरी करणारा प्रज्ञानंद हा भारतातील सर्वात तरुण खेळाडू होता. भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने प्रज्ञानंदला मार्गदर्शन केलं आहे.
हेही वाचा - Iga Swiatek : टेनिसपटू इगा स्वांतेकची बेट्ट ओपन स्पर्धेतून माघार; म्हणाली...