ETV Bharat / sports

Dhavan and Iyer dance video : बेबी कम डाउन गाण्यावर शिखर धवन आणि श्रेयस अय्यरने केला जोरदार डान्स - cricketers dance video

भारतीय फलंदाज शिखर धवन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. दिवसेंदिवस धवन सोशल मीडियावर मजेशीर व्हिडिओ शेअर करत असतो. त्याने पुन्हा एकदा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी त्याने व्हिडिओमध्ये श्रेयस अय्यरसोबत बेबी कम डाउन गाण्यावर जोरदार डान्स केला आहे.

Dhavan and Iyer dance video
शिखर धवन आणि श्रेयस अय्यर
author img

By

Published : Feb 6, 2023, 10:33 AM IST

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फलंदाज शिखर धवनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये श्रेयस अय्यर शिखर धवनसोबत 'बेबी कम डाउन' गाण्यावर डान्स करत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 10 लाख लोकांनी लाईक केले आहे. तर 5 हजार लोकांनी कमेंट केल्या आहेत. दोघांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओच्या माध्यमातून श्रेयसने त्याच्या फिटनेसचेही संकेत दिले आहेत. व्हिडिओमध्ये अय्यर फिट दिसत आहे. अशा परिस्थितीत तो लवकरच टीम इंडियामध्ये सामील होऊ शकतो, असे मानले जात आहे. श्रेयसचे संघात पुनरागमन झाल्याने संघ मजबूत होईल.

धवनने शेअर केला अय्यरसोबतचा व्हिडिओ : भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यर सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे. श्रेयस अय्यर दुखापतीमुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेतील पहिल्या सामन्यातून बाहेर पडला आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेतील पहिला सामना ९ फेब्रुवारी रोजी नागपुरात होणार आहे. श्रेयसच्या पाठीला दुखापत झाली आहे. दुखापतीमुळे अय्यर नुकताच न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर पडला होता. दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला अधिक वेळ आराम करण्याचा सल्ला देण्यात आला होता. पण आता शिखर धवनने श्रेयस अय्यरसोबतचा एक व्हिडिओ शेअर करून शुभ संकेत दिले आहेत.

श्रेयर संघात सामील होण्याची शक्यता : विशेष म्हणजे डिसेंबर २०२२ मध्ये बांगलादेशमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळल्यानंतर अय्यरला पाठीच्या खालच्या भागात सूज आली होती. बीसीसीआयने त्याला आराम करण्यास सांगितले होते. व्हिडिओ पाहून असे दिसते की श्रेयस अय्यर आता पूर्णपणे बरा आहे. तो एनसीएकडून फिटनेस प्रमाणपत्र मिळण्याची वाट पाहत आहे. 17 फेब्रुवारीपासून दिल्लीत सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी श्रेयर भारतीय संघात सामील होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी शिखर धवन डिसेंबर 2022 पासून संघाबाहेर आहे. त्याने 10 डिसेंबर 2022 रोजी बांगलादेशविरुद्ध भारतासोबत शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.

शिखर धवनची कारकीर्द : ऑक्‍टोबर 2010 मध्‍ये ऑस्‍ट्रेलियाविरुद्धच्‍या वनडेमध्‍ये, दिल्लीच्‍या फलंदाजाने भारताकडून आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. भारतीय संघातील धवनचे स्थान मात्र 2013 मध्ये त्याच्या उल्लेखनीय कसोटी पदार्पणाने निश्चित झाले. 10 वर्षांहून अधिक काळ, धवनने इंडियन प्रीमियर लीग (IPL) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट या दोन्हींमध्ये सातत्याने कामगिरी केली आहे. 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी, 2015 वर्ल्ड कप आणि 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये धवनने भारतासाठी सर्वात मौल्यवान धावा केल्या. इंडियन प्रीमियर लीगमध्ये सलग दोन शतके ठोकणारा तो पहिला खेळाडू आहे.

हेही वाचा : Shikhar Dhawan Wife :...म्हणून शिखर धवनच्या पत्नीला बदनामीकारक वक्तव्य टाळण्याचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.